डाकघर अधिक्षक कार्यालयात 25 एप्रिल रोजी विमा सल्लागार पदाच्या मुलाखती

नांदेड  – डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजने अंतर्गत “डायरेक्ट एजंट” (विमा सल्लागार) च्या भर्तीसाठी मुलाखती घेण्यात येत आहेत. यासाठी अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन 25 एप्रिल 2025 रोजी कार्यालयीन वेळेत अधिक्षक डाकघर, नांदेड विभाग,नांदेड 431601 येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने यावे. सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड विभागाचे अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.

पीएलआय व आरपीएल योजनेच्या एजंट विमा सल्लागार या पदासाठी  पात्रता व मापदंड पुढीलप्रमाणे आहे.  उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी 18 असावे. शैक्षणिक पात्रतेत अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा.

श्रेणी- बेरोजगार, स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य इ. टपाल जीवन विमा प्रतिनिधीसाठी थेट असे अर्ज करू शकतात.

उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. यात व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इ. बाबीवी चाचणी होईल. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी/केव्हीपी च्या स्वरूपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीए ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवाना मध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा ३ वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील असेही अधिक्षक डाकघर नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!