2020 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत 14 लाखांचा घोटाळा करणाऱ्या 20 जणांनावर गुन्हा दाखल 

नांदेड(प्रतिनिधी)-प्रधानमंत्री आवास योजनेकरीता पात्र नसतांना 20 अधिकारी आणि लाभधारक यांनी एकूण 14 लाख 40 हजारांचा अपहार केल्याप्रकरणी बिलोली न्यायालयाच्या आदेशानंतर कुंडलवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेख मकसुद शेख अहेमद लोहगावकर यांनी बिलोली न्यायालयात फौजदारी अर्ज क्रमांक 272/2025 दाखल करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र नसतांना बेघरांच्या यादीत समाविष्ट करून पंचायत समिती कार्यालयाने काही जणांना त्याचा लाभ मिळवून दिला. प्रत्येकाला 1 लाख 20 हजार अशी रक्कम यात अपहार झाली आहे. एकूण अपहार 14 लाख 40 हजारांचा आहे. पंचायत समितीने आपल्या अधिकारांचा गैरवापर करून हा अपहार केला आहे. न्यायालयाने या प्रकरणी कुंडलवाडी पोलीसांना भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471,34  प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार कुंडलवाडी पोलीसांनी संभाजी गंगाराम साखरे, नारायण गंगाधर साखरे, विरभद्र माधवराव साखरे, सदाशिव गंगाधर साखरे, हनमाबाई विठ्ठल साखरे, चंद्रकांत नागनाथ चेंडे, शंकर भगवंता खरबळे, दत्ताहरी नागनाथ चेंडे, यादव अमृता गायकवाड, शिवाजी लालप्पा साखरे, राम गंगाधर मेघे, सामराव शंकर साखरे सर्व रा.कौठा ता.बिलोली तसेच सन 2020 मधील ग्रामसेवक विठ्ठल गंगाधर वडजे, प्रदीप कोकरे, सरपंच गोदावरीबाई शंकर चेंडे, प्रकाश नागोराव साखरे, गृहनिर्माण अभियंता सचिन प्रकाशराव भद्रे, लेखाधिकारी दिलीप बळीराम चौंडे, गटविकासअधिकारी प्रकाश वसंतराव नाईक आणि राजकुमार मुक्कावार यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 61/2025 दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!