नांदेड, (प्रतिनिधी)-कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून श्री.गोविंद गिरी देवजी महाराज, किशोरजी व्यास यांच्या कृपाआशिवार्दाने प्रभू श्री रामचंद्रांच्या श्री रामनवमीनिमित्त राम पहाट या कार्यक्रमाचे आयोजन आज कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आले होते. राज्यभरातील दिग्गज कलावंतांनी प्रभू श्रीरामचंद्रावरच्या विविध रचना सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.
राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात हा राम गितांचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षापासून सातत्याने होत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती, निवेदन प्रख्यात निवेदक अॅड.गजानन पिंपरखेडे यांचे असून, निर्मिती सहाय्य पत्रकार विजय जोशी यांचे आहे. कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे. यावर्षी पुणे येथील प्रख्यात गायक संजीव मेहंदळे, प्रख्यात गायिका आरती दिक्षीत, प्रख्यात आसावरी जोशी-rबोधनकर, सुप्रसिध्द गायिका प्रणोती बिलोलीकर यांनी विविध भक्तीगिते सादर करुन नांदेडकरांना मंत्रमुग्ध केले. संगीत संयोजन छत्रपती संभाजीनगरचे राजेश देहाडे यांचे होते. तर तबला-ढोलक-ढोलकीवर सिध्दोधन कदम, तर अन्य संगीतसाथ बाबा खंडागळे, रोहित बन्सवाल व पवन तेहाले व व्हायोलिनवर पंकज शिरभाते यांनी संगीतसाथ दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन वे.शा.स.खंडूगुरु जोशी आसोलेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम सुरु होतांना वैदिक मंत्रघोष वे.शा.स.मनोजगुरु पेठवडजकर व याज्ञवल्क्य वेदपाठ शाळेचे विद्यार्थी यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामकथा व श्रीमद भागवत कथेचे निरुपणकार वे.शा.स.विश्वासशास्त्री घोडजकर यांना रामसेवा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास शिवप्रसाद राठी, पोटविकार तज्ज्ञ डॉ.नितीन जोशी, डॉ.हंसराज वैद्य, उद्योजक राजेंद्र हुरणे, रमेश मिरजकर, अनिल शेटकार, महावीर सेठीrया, पंकज लोखंडे हे मान्यवर देखील उपस्थित होते.
दिपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रख्यात गायक संजय मेहंदळे, आरती दिक्षित, आसावरी जोशी, प्रणोती बिलोलीकर, रमेश मेगदे, विजय जोशी यांनी विविध रचना सादर केल्या. त्यात नादातून या नाद निर्मितो, विश्वाचा विश्राम रे, उठी श्रीराम पहाट झाली, ढुमक चलत रामचंद्र, अविरत ओठी यावे नाम, मन राम रंगी रंगले, राम का गुणगाण किजीए, आज अयोध्या सजली, अब उठो सिया सिंगार करो, मेरी झोपडी के भाग जायेंगे राम आऐगे, रामा रामा रटते रटते बितीरे उमरीया अंजनीच्या सूता, बाजे रे मुरलीया, बजाओ ढोल स्वागत मे आदी रचना सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रणोती बिलोलीकर हिने गायिलेल्या गितावर रसिकांना ठेका धरला. या गाण्याला वन्समोअर मिळाला. सर्वच कलावंतांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी केले. तर उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश मेगदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रसाद राठी, डॉ.सुरेश दागडीया, अॅड.चिरंजीलाल दागडीया, निलेश चांडक, रमेश सारडा, नंदकुमार दुधेवार, माधवराव पटणे, प्रणव मनूरवार, प्रा.प्रभाकर उदगीरकर, स.जगजीवनसिंघ रिसालदार, डॉ.सुशिल राठी, विजय डुमणे, रमेश सुरकुटवार तसेच स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र सोमेश कॉलनी नांदेड येथील सर्व सहकार्यांनी व महिलांनी परिश्रम घेतले.
Jai
Shree
Ram