मध्यवर्ती बसस्थानकाचे 12 एप्रिल पासून नवीन कौठा भागात स्थलांतर

नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या अनेक दिवसापासून मध्यवर्ती बसस्थानकाचे स्थलांतर होणार असल्याची चर्चा होती. यासाठी अनेक ठिकाणी पर्यायी जागेचा शोध सुरू होता. मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वे स्टेशन या दरम्याच्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तात्पुर्त्या स्वरुपात बसस्थानक स्थलांतर केल जाणार असून आता येत्या 12 एप्रिलपासून मध्यवर्ती बसस्थानक हे नवीन कौठा येथे असणाऱ्या शासकीय जागेवर स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी दिली आहे.
रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक या दरम्यानच्या रस्त्याची दैनिय अवस्था गेल्या अनेक वर्षापासून झाली आहे. अनेकदा या रस्त्याचे कामही करण्यात आले. पण अद्यापही या रस्त्याचे दर्जेदार काम झाले नसल्याने अखेर या रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी दि.12 एप्रिलपासून नवीन कौठा भागात असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर हे मध्यवर्ती बसस्थानक स्थलांतर करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी करून व नवीन कौठा येथील जागेचीही पाहणी केली. अखेर जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार तात्पुर्त्या स्वरुपात मध्यवर्ती बसस्थानक नवीन कौठा येथील शासकीय जागेवर स्थलांतरीत करण्यात येत आहे. याचबरोबर बसस्थानक स्थलांतर झाल्यामुळे काही मार्गावरील गाड्यांच्या टप्यात वाढ आणि घट झाली आहे. म्हणजे किलो मिटर या अंतरात बदल होणार आहे. याचबरोबर दैनंदिन वाहन देखभाल आणि इंधन भरण्यासाठी आहिल्याबाई होळकर चौक, खडकपुरा,मध्यवर्ती कारागृहाच्या बाजूने आगारामध्ये जाण्यासाठी हा मार्ग आहे. तर बाहेर निघण्यासाठी डॉक्टर लाईनच्या पहिल्या गल्लीतून बसेस बाहेर काढता येणार आहेत. यात वसमत, भोकर, वारंगा यामार्गावरुन येणाऱ्या गाड्यांच्या किलोमिटरमध्ये 9.5 किलो मिटरने वाढ झाली असून यात 1.5 टप्यांनी वाढ झाली आहे. तर लोहा-सोनखेड मार्गे येणाऱ्या गाड्यांच्या अंतरामध्ये 7.1 किलो मिटरने घट झाली आहे. याचीही प्रवाशांनी नोंद घ्यावे असे राज्य परिवहन महामंडळाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!