नांदेड(प्रतिनिधी)-मौजे चिंचोली ता. लोहा येथील शेत शिवारात एका 28 वर्षीय व्यक्तीचा खून एका 22 वर्षीय युवकाने केला आहे. यात पैसे-देण्या-घेण्याचे कारण दिसत आहे.
आनंदा दाजीबा हंबर्डे रा.पाटोदा ता.नायगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास दादाराव आनंदा हंबर्डे (28) यास दिनेश व्यंकटराव शिंदे (22) याने कोणत्याही धार-धार हत्याराने त्याचा गळा कापुन खून केला आहे. यात पैशांची देवाण-घेवाण व मोबाईल फोन अशी कारणे आहेत. उस्माननगर पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 55/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गजानन गाडेकर आणि पोलीस अंमलदार नामदेव रेजितवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. पकडलेला मारेकरी दिनेश व्यंकटराव शिंदे (22) रा.चिंचोली ता.लोहा यास न्यायालयाने 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 वर्षीय युवकाचा खून
