मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक 

 

नांदेड :- जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यामध्ये आरोग्य विभागाच्या विविध विषयावर आढावा घेण्यात आला. विविध राष्ट्रीय कार्यक्रम व शासनाच्या विविध योजना व कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात तसेच माता मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी सर्व स्तरावर उपयोजना करणे,माता मृत्यू व बालमृत्यू कमी करणे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्या.

त्यांनी माता बाल संगोपन, लसीकरण, माता मृत्यू, बालमृत्यू कमी करणे, राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम, राष्ट्रीय किटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (हिवताप, हत्तीरोग), साथ रोग नियंत्रण कार्यक्रम, सुमन कार्यक्रम, एनकास, काया कल्प, संस्थांचे कन्स्ट्रक्शन, पाण्याच्या स्रोतांची तपासणी, सिकलसेल तपासणी कार्यक्रम, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय किशोरवयीन सुरक्षा कार्यक्रम, असंसर्गजन्य आजार, संसर्गजन्य आजार कार्यक्रम, बायोमेट्रिक अटेंडन्स असे व अशा या कार्यक्रमांचे अंमलबजावणी होऊन कार्यक्रमाचा उद्देश पूर्णपणे साध्य व्हावा तसेच आरोग्य विभागातील अस्थापना यांनी आपले काम वेळेत पूर्ण करावे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिराणी मॅडम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.शिवशक्ती पवार, प्रशासकीय अधिकारी नीमलवार, सांख्यिकी अधिकारी डुबुकवाड, आयुष अधिकारी डॉ. मुरमुरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!