नांदेड(प्रतिनिधी)-31 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता गिट्टीने भरलेल्या एका हायवा गाडीने दुचाकीवर स्वार एका पोलीस पुत्राचा जिव घेतला आहे. प्रत्यक्ष दर्शी सांगतात ती हायवा गाडी अत्यंत गतीवान वेगाने धावत होती आणि त्या गाडीने दुचाकी स्वाराला जवळपास 50 फुट ओढत नेले. ज्यामुळे त्या दुचाकीवरील स्वाराचा चेंदा-मेंदा झाला होता.
डॉ. व्यंकटेशप्रसाद साहेबराव मामीलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.31 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास दुचाकी क्रमंाक एम.एच.26 बीपी 9373 वर बसून शुभम नागेश वाघमारे (29) हे व्यक्ती आपल्या घराकडे जात असतांना हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 बीई 7971 च्या चालकाने अत्यंत निष्काळजीप णे आणि भरधाव वेगात गाडी चालवून शुभम नागेश वाघमारेच्या दुचाकीला धडक दिली. हा घटनाक्रम बॉम्ब शोध व नाशक पथक कार्यालयासमोर कौठा येथे घडला. शुभम वाघमारे यांचे वडील नागेश वाघमारे हे पोलीस होते. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 312/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
हायवा गाडीने पोलीस पुत्राला चिरडले
