कुडाच्या शाळेत दोन खोल्यांचे एक गेस्ट हाऊस बांधले. नातेवाईक, मित्र यांना मोठी उत्सुकता लागलेली होती की खोपडे साहेब आता वास्तुशांती कधी घालतील? उठ सूट बामणी काव्याविरुद्ध लिहिणाऱ्या त्यांना आता ब्राह्मणाकडे जावंच लागेल. पण मी ब्राह्मणाला बोलवले नाही!
वास्तुशांती का घालावी याचा शोध घेत असता समजले की खोदकाम, बांधकाम करताना अनेक जीवजंतू, कीटक, वनस्पती मारले जातात. शिवाय पंचमहाभुते म्हणजे पृथ्वी, वायू,आप, तेज, आकाश हे नाराज होतात. वास्तू देवता, कुलदेवता यांना शांत करावे लागते. त्यासाठी ब्राह्मण बोलावून पूजा घालावी लागते. त्यामुळे धन दौलत, आरोग्य,ऐश्वर्य प्राप्त होते. आमच्या गावातील किशोर काका,दिलीप काका,…
हे फार जालीम ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध आहेत. हे सगळं मिळवून देण्याची अशी कोणती ताकद आहे त्या ब्राह्मणांच्या मध्ये?ते आले की अंगावरील नेहमीचे कपडे फेकून देतात. कमरेला पंचा गुंडाळतात. गळ्यात जाणवे असते मग ते यज्ञ पेटवतात. मंत्र म्हणतात. गडबडीत सगळं उरकतात.
त्यांच्या मंत्रांनी मेलेले कीटक,जंतू, वनस्पती जिवंत झाल्याचे पाहायला मिळाले नाही. तसे असते तर त्यांनी आपले सगळे पूर्वज आतापर्यंत जिवंत केले असते! पंचमहाभूते खुश झाल्याचे दिसले नाही.
बरं त्यांचे मंत्र समजून घेतले तर ते आम्हाला माणूस नव्हे तर राक्षस गण असे जाहीरपणे मंत्रातून म्हणतात. क्षत्रिय असले तरी ते ब्राह्मणी सनातन धर्मानुसार रजो गुणी राक्षस ठरतात. अर्धवट शाळा शिकलेली ही बामणाची पोर आम्हाला माणूस म्हणायला सुद्धा तयार नाहीत. मृत्यूनंतर आमची जागा पृथ्वीवरच असते व कितीही भ्रष्ट असले तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ असलेल्या या बामनांची जागा स्वर्गात असते. हेच ते या मंत्रातून आम्हाला सांगत असतात. पुढे हेही सांगतात की परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. क्षत्रियांच्या विधवा स्त्रियांशी संबंध ठेवून तुमचा जन्म वेगवेगळ्या ऋषी कडून झाला व तेच तुमचे गोत्र आहे. आश्चर्य म्हणजे मोठ्या कौतुकाने आम्ही आमचे गोत्र इतरांना सांगत त्याचा अभिमान बाळगत असतो. असो.
हे सांगितल्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांच्या पाया पडतो. ग्लासभर दूध देतो. कारण ते आम्ही खालच्या वर्णाचे असल्याने आमच्या हातचे खात नाहीत. असे असले तरी एरवी हॉटेलमध्ये जाऊन ते कोणाच्याही हातचे बरेच काही बाही खातात अशी चर्चा असते.
मग मोठी दणदणीत बिदागी दिली जाते. कमी दिली तर ते भांडण करून वसूल करतात. आमच्या गावात सगळ्या वस्तू उधारीवर मिळतात पण बामनांचे मंत्र कुणाला उधारीवर मिळाले असे मी तरी ऐकलेले नाही. बामनाला नाराज करणे आम्हाला परवडण्यासारखे नसते असे प्रत्येकाला वाटते. गले लठ्ठ दक्षिणा पाकिटात कोंबून, कोरडा शिधा फटफटीला बांधून सुसाट निघून जातात. त्यांचे बाप ज्यादे सायकलवर व त्या अगोदर बैलगाडीतून, त्या अगोदर….., घेऊन जात एवढाच काय तो फरक. या बामणांची एवढी सेवा करून आमचे धनदौलत ऐश्वर्य खरेच वाढते का? 1972 च्या दुष्काळामध्ये आम्ही पूजा घालणारे सगळे शेतकरी खोरं, टिकाव ,घमेल घेऊन दुष्काळी कामावर गेलो. तिकडे डुकरांना खाऊ घालणारा मीलो आणि मका खात आम्ही जगलो. पण हे व यांचे आई-वडील वाड्यात बसून वरण-भात साजूक तूप खात राहिले. मग धन ,ऐश्वर्य कुणाला मिळाले?
मी गृहप्रवेश केला पण बामणाला न बोलावता वास्तुशांती पूजा न घालता . माझी नातवंड कबीर आणि सारा ही सुट्टीवर घरी आली होती. माझे आई वडील म्हणजे त्यांचे पणजोबा, पणजी यांचे फोटो नवीन वास्तूच्या दारात ठेवले. माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा बामणी कावा हा शब्द समजावून सांगितला होता. पण ते बामणी कावा, बामणी शोषण यातून बाहेर पडू शकले नव्हते. मी ते केले. त्या पोरांनी जवळपासची फुले तोडून त्या दोन फोटोंना वाहिली. मग थोरांचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही गृहप्रवेश केला. कबीर साराचे पंजोबा आबासाहेब खोपडे हे हाडाचे शेतकरी. त्यांचे शेतीवरील प्रेम मी जवळून पाहिलेले. ब्राह्मण हा बहुजनांचा मोठा लुटारू, शोषण करता व दैववादी बनवून सर्वांगीण प्रगती रोखणारा शत्रु आहे हे मी खूप वर्षांपूर्वी ओळखले होते. त्यामुळे मी वडिलांचा कोणताच विधी केला नव्हता. दहाव्या दिवशी त्यांच्या हस्ती मी आमच्या सर्व शेतीमध्ये विखुरलेल्या होत्या. आजही मला ते प्रत्येक ढेकळा मध्ये असावेत असा भास होतो.
माझ्या भोवताली 99. 99% बहुजन हे ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली जगतात.त्यांनी चिकित्सा करणे सोडून दिलेले आहे. बहुजनांना प्रचंड दुःख, समस्या आहेत.ती निवारणारी एकच संस्था आहे ती म्हणजे ब्राह्मण. या ब्राह्मणांना कुठलीच शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टीची अक्कल नाही. ज्यांना आहे ते येड्याचे सोंग घेऊन पेडगावला जाताना दिसतात. आपली पोट भरण्यासाठी व आपले वर्ण श्रेष्ठत्व कायम राखण्यासाठी त्यांनी अशास्त्रीय ग्रंथ लिहिले. बहुजनांना मूर्ख बनविले. ते आजही चालू आहे.
बरं हे भट असे फुकट काम करत नाहीत. मूळ भगवद् गीतेत अध्याय 17 ओवी 13 मध्ये हे घुसडलेले आहे की यज्ञ पूजा केल्यावर ब्राह्मणाला दक्षिणा दिली नाही तर केलेला विधी व्यर्थ जातो. केवढा हा बामणी कावा!
पंचमहाभूतांना शांत करण्याची कोणती ताकद किशोर, दिलीप आणि भूतलावरील सर्व बामणामध्ये आहे? कुठलीच नाही! ती भारतातील कोणत्याच बामनाकडे नाही. ज्याच्याकडे असेल त्याने आपले नाव जाहीर करावे. पण कितीही शिकलो तरी आम्ही वास्तुशांती पूजा घालणारे बहुजन हे ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या ग्रंथांचे मानसिक गुलाम आहोत.
ब्राह्मण कोणत्या गोष्टीचा फायदा घेतो?
मानवाला अनेक मूलभूत शाप (sins) आहेत. प्रत्येक माणसात जन्मतःच प्रचंड आळस (laziness) भरलेला असतो, परंपरेने आलेल्या गोष्टी बदलणे नवीन स्वीकारणे याबद्दल त्याच्या मनात उपजत प्रचंड भीती (fear) असते, कोणत्याही कामाचे तात्काळ फळ मिळावे (instant gratification)अशी प्रत्येकामध्ये इच्छा असते,….., अनेक संस्कृतीमधील मानवाने क्रांती करून या शापावर विजय मिळविलेला आहे. मी जवळून पाहिलेला चीन हा देश. आपल्यासारखाच शेतीप्रधान व दारिद्र्याने ग्रासलेला. तिथं मावो च्या नेतृत्वाखाली क्रांती झाली. माणसाला मागे खेचणाऱ्या, त्यांचे शोषण करणाऱ्या शक्तीचा बीमोड करण्यात आला. आळस, भीती यावर मात करून कोणतेही यश मिळवण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात हे ते शिकले. चीन सह सर्व देशांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी राजकीय उत्तर शोधले. आपणही राज्यघटनेच्या रूपातून राजकीय उत्तर शोधले.पण ज्याची पाळमुळे गेली शेकडो वर्ष या मातीत खोलवर रुजलेली आहेत ती मनुस्मृतीतून सांगितलेली वर्ण व्यवस्था
नष्ट करण्याबद्दल आपण काहीच केले नाही. आणि कालांतराने हीच वर्ण व्यवस्था इथल्या लाभार्थी ब्राह्मणांनी पुनर्जीवित केली. आज ती विकृत रूपात अक्राळ विक्राळ रूप घेऊन जिवंत झाली. आमच्या गावाला कार्य प्रेरित करून दिशा (खरे तर दिशाहीन बनवण्याचे) देण्याचे काम करण्यात किशोर आणि दिलीप बामन प्रभावी ठरले. लोकशाही पद्धतीच्या नावाखाली परंतु घराणेशहीतून निर्माण झालेले नेतृत्व स्वतःला टग्या म्हणविणारे अजित पवार सिमेंट, विटा, दगड, माती यात रमले. अनेकदा संसद रत्न ठरलेल्या सुप्रियाताई संसदेत प्रभावी ठरल्या. गावात नाही. शाहू फुले आंबेडकर यांची परंपरा सांगणारे शरद पवार मागे पडले. माझ्यासारखे राजकीय व्यवस्था बदलण्याची मांडणी करणारे तर या राजकीय व्यवस्थेमध्ये आपले डिपॉझिट व घरदारही घालवून बसले.आपल्याकडे चीन सारखे झाले नाही. इथे स्वतःला देव समजणारा ब्राह्मण कितीही भ्रष्ट असला तरी तो, तिन्ही लोकी श्रेष्ठ असतो असे धर्म ग्रंथातून लिखित स्वरूपात व रामदासी बैठकीतून बहुजनांच्या मनावर बिंबवले जाते. गोरी कातडी व अगम्य,अर्थहीन संस्कृत मधील श्लोक याच्या आधारे याने इथल्या बहुजनांचा आळस आणखी वाढवला, अल्पसंख्यांकाचा बागुलबुवा उभा करून भीती वाढवली. साधी पूजा घातली, बामनाला भरपूर शिधा आणि दक्षिणा दिली की सगळी दुःख निघून जातात व बहुजनांची मनोकामना लगेच पूर्ण होईल असे सांगितले. असा खोटा संदेश गेले दोन हजार वर्ष पसरविला. व आता ते प्रत्येक क्षेत्रात मूलभूत दोष वाढवण्याचे काम करीत आहेत. आठ इंच बाय पाच इंच बाय दोन इंच जाडीचे पंचांग नावाचे अद्भुत पुस्तक हातात घेऊन हे सर्व बहुजनांना फसवीत आहेत. आम्हीही फसत आहोत.
वास्तू बांधताना मरणारे जंतू जीव वनस्पती हे बामनाच्या अर्थहीन मंत्रांनी जिवंत होणार नाही. वास्तू देवता कुलदेवतेची शांती होणार नाही. पृथ्वी आप तेज वायू यासारखी पंच महाभूते शांत होणार नाहीत. खरे तर या शक्तींचा अभ्यास करून त्यांच्यावर स्वार झाले पाहिजे व मानवी कल्याणासाठी त्यांच्या वापर केला पाहिजे. ते काम माझी नातवंडे कबीर आणि साराच करतील. ती ताकद त्यांच्या मनगटात आहे. कावेबाज पोट भरू बामनांच्या अर्थहीन मंत्रात नाही. म्हणून तर त्यांचे हस्ते वास्तु पूजा केली.
ती जशी माझ्या कबीर आणि सारा यांच्या मनगटात आहे तशी ती तुमच्याही कबीर आणि साराच्या मनगटात आहे. हे निश्चित!
-सुरेश खोपडे