भारताच्या नॉर्थ इस्ट भागात व्यवसायाची संधी याचे ज्ञान बांग्लादेशचे प्रमुख युनूस मोहम्मद चिनला देतात; किती घातक प्रकार आहे हा

भारताच्या अंतर्गत प्रश्नांबाबत बांगादेशचे प्रमुख युनुस मोहम्मद यांनी चिनमध्ये उभे राहून केलेल्या वक्तव्य भारत सरकारने अद्याप गांभीर्याने घेतले नाही. खरे तर वक्तव्य येताच ते घ्यायला हवे होते. भारतामध्ये सेवन सिस्टर्स नावाने एक भाग नामांकित आहे. हा भाग भारताच्या उत्तरपुर्व भागात आहे. अर्थात ते भारताचे मस्तक आहे आणि त्या भागाचा पालक भारत देश आहे. परंतू युनुस मोहम्मदने चिनमध्ये भाषण करतांना सांगितले की, सेवन सिस्टर्स या भागाला कोठेही समुद्र सिमा नाही. समुद्र सिमेचे पालक आम्ही आहोत. सेवन सिस्टर्स भागाचा व्यवसायीक मार्ग आमच्या समुद्री मार्गातूनच जातो. त्या भागात भरपूर व्यवसायाची संधी आहे. तुम्ही प्रयत्न करा आणि आम्ही त्यात मदत करू. हे वक्तव्य भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे. चिन आमचा शत्रु आहे आणि शत्रुच्या घरात उभे राहुन मोहम्मद युनूस यांनी केलेल्या वक्तव्य अत्यंत धोकादायक आहे. याची दखल त्वरीत घेतली नाही तर चिन काय करेल याचा उल्लेख आज करता येत नाही.


बांग्लादेशमध्ये सत्ता बदल झाला आणि बांग्लादेशचे प्रमुख युनूस मोेहम्मद झाले. खरे तर युनूस मोहम्मदच नव्हे तर बांग्लादेशाचा जन्म भारताच्या मदतीनेच झालेला आहे. पण माहित नाही वेळ बदलते, माणसे बदलतात आणि विचारपण बदलतात असेच काही युनूस मोहम्मदच्या मनात आले असेल. त्यांच्या मनात चिनची मैत्री जास्त आवश्यक असेल आणि त्यामुळेच त्यांनी सेवन सिस्टर्स या भागात असणाऱ्या व्यवसायीक मार्गासाठी चिनने आमचा उपयोग करावा असे वक्तव्य केले. खरे तर हे वक्तव्य करण्याचा अधिकारच युनूस मोहम्मदला नाही. भारत हा सक्षम देश आहे आणि भारताकडे एवढे ताकत आहेच की, आपल्या सेवन सिस्टर्सची रक्षा देश करू शकतो. तरी पण आम्ही पालक आहोत असे म्हणण्याचा अधिकार नक्कीच मोहम्मद युनूसला नाही. पण सध्या भारतात बाबरला कोणी बोलवले यावर चर्चा करून देशात विद्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. याचाच फायदा बहुदा मोहम्मद युनूसने घेतला असेल. खरे तर बांग्लादेशला भारताच्यावतीनेच वीज पुरवठा होतो.1 बिलियन डॉलर थकबाकी असतांना सुध्दा भारत वीज पुरवठा करत आहे. याचे उपकार तर सोडाच पण भारताविरुध्द बोलण्याची ही ताकत युनुस मोहम्मदमध्ये कशी आली. कारण भारताने वीज पुरवठा बंद केला तर संपुर्ण बांग्लादेश ठप्प होईल.
वाचकांसाठी आम्ही काय आहे सेवन सिस्टर्स हे स्पष्ट करू इच्छीतो.
आसाम वगळता सिक्कीम, मेघालय, मिझोराम, नागालेंड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश हे सर्व राष्ट्र म्हणजे सेवन सिस्टर्स हा भाग भारताचा उत्तर पुर्व भाग आहे आणि उत्तरपुर्व भागातच चिन वसलेले आहे. जो आमचा शत्रु आहे. हिंदी चिनी भाई-भाई अशी घोषणा देत 1962 मध्ये चिनने आमच्यावर हल्ला केला होता. चिनची ख्याती आहे. त्याला इतरांचे प्रदेश बळकावण्याची नेहमीच इच्छा असते. 1971 मध्ये नॉर्थ इस्ट कॉन्सील तयार करण्यात आली. त्यामध्ये हे सर्व सात प्रदेश आहेत. ज्यातून आसामला वेगळे समजले जाते. कारण आसाम हे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच राज्य आहे. इतर राज्य अर्थात अरुणाचल प्रदेश-1987, मेघालय-1971, मिझोराम-1987, नागालेंड-1963, मणीपुर-1971, त्रिपुरा-1971 आणि सिक्कीम-1975 या वर्षांमध्ये या केंद्र शासित प्रदेशांना पुर्ण राज्यांचा दर्जा प्राप्त झाला. या सर्व राज्यांची भौगोलिक पाहणी केली असता एकूण 2 लाख 62 हजार 184 चौरस किलो मिटरचा हा भुभाग आहे. सेवन सिस्टर्स भारताच्या एकूण भुभागापैकी फक्त 8 टक्के भाग आहे. परंतू या भागाचे महत्व भरपुर आहे. जे भारत देशाच्या पागोट्यामध्ये तुरा रोवल्या सारखा आहे. भारताची अंतरराष्ट्रीय सिमा ज्यामध्ये 90 टक्के भाग या सात राज्यांशी जोडलेला आहे. भारताची एकूण अंतर राष्ट्रीय सिमा या 7 राज्यांमध्ये 5 हजार 182 चौरस किलो मिटर आहे. ज्यामध्ये चिनसोबत 1395 चौरस किलो मिटर उत्तरेकडे आहे. इकडेच चिन सुध्दा आहे. म्यानमार सोबत अंतरराष्ट्रीय सिमा 1640 चौरस किलो मिटर आहे ती पुर्वेकडे आहे. बांग्लादेशासोबत 596 चौरस किलो मिटर सिमा आहे जी भारताच्या दक्षीण-पश्चिममध्ये आहे. नेपाळ देशासोबत भारताची सिमा सर्वात कमी 97 चौरस किलो मिटर आहे. जी पश्चिमेकडे आहे. भुतान या देशासोबत 435 चौरस किलो मिटर सिमा आहे जी भारताच्या उत्तरपश्चिममध्ये आहे.
चिन हा देशा आपला विस्तार करू इच्छीतो. त्यांच्याकडी सामरिक शक्ती भरपूर आहे. तो भारताच्या उत्तरपुर्वेकडे ही शक्ती जमवत आहे. याच भागात भारतासोबत चिनचा वाद सुरू आहे. या सेवन सिस्टर्समध्ये सिंगरुल कॉडीडोअर हा भाग भारताच्या आसाम राज्याचा प्रवेशद्वार आहे. भारत आणि चिन या दोन देशांच्या दृष्टीकोणातून या भागामध्ये खनिज, वनसंपत्ती आणि इतर बाबी महत्वाच्या आहेत. उत्तर पुर्व भागात चिनसोबत आमचे खटके अर्थात भारत देशाचे खटके 1962 पासून सुरू आहेत. पण चिन घात लावून बसलेला आहे. या हजारो किलो मिटर आंतरराष्ट्रीय सिमेमध्ये 1-1 चौरस किलो मिटर भाग माझ्या ताब्यात यावा यासाठी चिन प्रयत्नशिल आहे. मागचा चिनसोबत झालेला युध्द विराम आठवा वाचकांनो त्यामध्ये लद्दाख भागात नो मॅन्स लॅंड असलेली जमीन चिनने आपल्या ताब्यात घेतली आणि भारताची जमीन नो मॅन्स लॅंड केली. ते भारताने मान्य केलेले आहे. खरे तर त्यासाठी आमच्या अनेक जवानांनी आपले बलिदान दिले होते. लद्दाखचा जो भाग चिनने आपल्या ताब्यात घेतला. ती जमीन लद्दाखवासियांसाठी गोचर जमीन (जनावरांना चारण्याची जागा)होती. या संदर्भाने लद्दाखचे खासदार लोकसभेमध्ये नेहमीच आवाज उठवतात. तरी पण भारताने कधीच त्याची चिंता केलेली नाही.
बांग्लादेशच्या काही पत्रकारांचे म्हणणे आहे. अमेरिका आणि चिन दोन्ही आपला खेळ खेळत आहेत. पण त्या दोघांना बांग्लादेशच्या हद्दीत आपले सामरिक पोर्ट हवे आहे. परंतू त्या सर्व खेळामध्ये बांग्लादेशाची वाट लागत आहे. पण आम्ही काही करू शकत नाही याचे दु:ख आम्हाला आहे. भारताच्यावतीने सेवन सिस्टर्स भागात अनेक विकास योजना राबविण्यात आल्या आहेत. त्या विकास योजना माजी पंतप्रधान अटलबिहारीजी वाजपेयी, डॉ.मोहनमोहनसिंघजी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याही काळात राबविल्या जात आहेत. परंतू युनूस मोहम्मद यांनी चिन देशात उभे राहुन केलेल्या वक्तव्याचा निषेध मात्र भारताने केला नाही. याचे दु:ख वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!