देगलूर-मुख्य रस्त्यावरील खड्डा चुकविताना ऑटो चालकाने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल ला जोराची धडक दिली . या धडकेत 17 जण जखमी झाले असून तीन गंभीर रुग्णांना नांदेडला नांदेडला पाठवण्यात आले आहे. सदरील घटना मंगळवार दि.1 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कारेगाव फाटा येथे घडली.
देगलूरहून झरी माळेगाव कडे एका ऑटो मध्ये (क्र. टी एस 16 यु ए 32 77) 7 ते 8 प्रवासी घेऊन जात असताना कारेगाव फाटा येथील मुख्य रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या दरम्यान समोरून येणाऱ्या अर्थात बिदर हून देगलूर मार्गे नांदेड कडे जाणाऱ्या पंजाब येथील शिख बांधवांच्या टेम्पो ट्रॅव्हलला (क्र. एम एच ४९ ए टी ३६३०) जोराची धडक दिली. या धडकेमध्ये ऑटो मधील 7 व टेम्पो ट्रॅव्हल मधील 10 असे एकूण 17 जण जखमी झाले आहेत .
घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड यांनी दोन ते तीन ॲम्बुलन्सला पाचारण करून घटनास्थळी धाव घेतली. ताबडतोब सर्व जखमींना येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश देवणीकर व त्यांच्या संपूर्ण टीमने येथे प्राथमिक उपचार करून दोन ते तीन गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्राने दिली आहे..
Video Player
00:00
00:00