कुणाल कामरा या कॉमेडियनने विडंबन काव्य केल्यानंतर त्या ठिकाणी हल्ला झाला ज्याठिकाणी कार्यक्रम झाला होता. त्यानंतर बरेच शिवसेना नेते त्याच्याबद्दल बोलत होते. काहींनी टायरमध्ये टाकून प्रसाद देण्याचे शब्द सुद्धा सांगितले. पण दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे. त्यानंतर मात्र तामिलनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी आता कामराला हात लावून दाखवा असे वक्तव्य केले आहे. सोबतच एनडीटीव्ही मराठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरूद्ध बोलत आहे आणि त्यांच्यामध्ये कामराला आवरण्याऐवजी नेत्यांना आवरण्याची गरज आहे. एनडीटीव्ही गौतम अदानी यांची आहे. याच गौतम अदानींना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी धारावी पुर्नविकासासाठी दिली आहे. याचा काय विचार करायला पाहिजे, हे आम्ही वाचकांसाठी सोडत आहोत.
कुणाला कामरा या कॉमेडियन एक विडंबन काव्य केले. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बेअब्रू करणारे शब्द वापरले असा आरोप कुणाल कामरावर करण्यात आला. त्यानंतर काही शिवसेना कार्यकर्त्यांनी त्याठिकाणची तोडफोड केली जेथे कुणाला कामराने कार्यक्रम केला होता. परंतु तोपर्यंत कुणाला कामरा तामिलनाडूला गेले होते. त्यांनी तेथील उच्च न्यायालयात दाद मागितली आणि उच्च न्यायालयाने त्यांना 7 एप्रिल 2025 पर्यंत अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. हा जामिन मंजूर होताच तामिलनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी आता कुणाल कामराला हात लाऊन दाखवा असे वक्तव्य केले. याबद्दल मात्र कोणीच काही बोलत नाही. 28 मार्च रोजीच सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश येथील खासदार इमरान प्रतापगडी यांच्याबद्दल दिलेला न्यायनिर्णय कुणाल कामराला जामीन मिळण्यासाठी महत्वाचा ठरला. इमरान प्रतापगडीच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालय, गुजरात पोलीस, गुजरातमधील भाजपचे नेते यांच्यावर ताशेरे ओढत अशा पद्धतीने काम चालत असेल तर ते सरकार किती असहिष्णू आहे असे दिसते. भारतीय संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. ते लेखणी, कविता, विचार याच्यातून मांडता येतात, असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने करून इमरात प्रतापगडीविरूद्धची तपासाची प्रक्रिया स्थगित केली आहे.
मुंबईमध्ये आमदार मुरली पटेल यांच्या तक्रारीवरून इमरान प्रतापगडीविरूद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ज्यामध्ये दखलयोग्य भारतीय न्यायसंहितेच्या कलमांचा वापर करण्यात आला आहे. यावर शिवसेनेच्यावतीने पर्यटनमंत्री असलेले शंभूराज देसाई सांगतात आम्ही मंत्री आहोत, आम्हाला करता येणार नाही, परंतु कुणाला कामराला खेचत आणत त्याला टायरमध्ये टाकून प्रसाद दिला पाहिजे. विडंटन काव्य करणे ही बेअब्रू असते काय असा प्रश्न खा. संजय राऊत यांनी उचचला आहे. ते सांगतात मुस्लिम राज्यांमध्ये कामराच्या विडंटन काव्यातील शब्द आहे त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी शंभर फटके मारून फाशी दिली जाते.
याही पेक्षा मोठी गोष्ट आम्ही वाचकांसाठी उपस्थित करू इच्छितो की, एनडीटीव्ही मराठी ही वृत्तवाहिनी गौतम अदानी यांची आहे आणि त्या वृत्तवाहिनीमध्ये कुणाला कामराला नव्हे तर नेत्यांना आवरण्याची गरज आहे, या शिर्षशाखाली विविध शिवसेना नेत्यांचे बोलणे दाखविले जात आहे. यावर विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करायला हवा की नाही, कारण मुख्यमंत्री असताना याच गौतम अदानींना धारावी ही झोपडपट्टी विकासासाठी दिली होती. तरी पण ते त्यांच्याबद्दल उलट बातम्या देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे विचारांची लढाई विचारांनीच करायला हवी, असे केल्यामुळे कुणाला कामरा याचा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला. तोडफोडीची घटना घडली नसली तर बहुदा त्याच्या व्हिडीओला ऐवढे दर्शक प्राप्त झाले नसते, असे आम्हाला वाटते.” बूंदसे गई तो वो हौज से नहीं आती’ या शब्दांसह या परिस्थितीचा विचार काय करायला हवा याची जबाबदारी आम्ही वाचकांना देत आहोत.
कुणाल कामराला अटकपूर्व जामीन
