नांदेड(प्रतिनिधी)-कृषी अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांना दिलेल्या जाणाऱ्या सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचांची सतत तीन वर्ष वितरकांसोबत संगणमत करून खोटा दस्तऐवज तयार करून तो खरा असल्याचे शासनाला भासवले आणि त्यात 5 कोटी 98 लाख रुपयांची शासनाची फसवणूक झाली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घोटासंदर्भाने विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
नांदेड येथील कृषी कार्यालयतील तंत्र अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक एस.एस.स्वामी यांनी दिलेल्यातक्रारी नुसार सन 2021, 2022 आणि 2023 मध्ये आर.जे.मरदोडे यांच्यासह तत्कालीन कृषी पर्यवेक्षक, कृषी वितरक यांनी संगणमत करून जिल्ह्यातील सुक्ष्म सिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेले ठिबक आणि तुषार संचांची मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तपासणी न करता कृषी पर्यवेक्षक यांनी वितरकांसोबत संगणमत करून खोटा दस्तऐवज तयार केला आणि तो खरा असल्याचे भासवून शासनाची 5 कोटी 98 लाख रुपयांची फसवणूक करून अपहार केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 403, 406, 409, 34 प्रमाणे 14 लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक 296/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर करणार आहेत. या प्रकरणी सध्या सुरू असलेल्या विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या पोलीस प्राथमिक मध्ये तत्कालीन कृषी पर्यवेक्षक आर जे मरदोडे सध्या कार्यरत कृषी अधिकारी कार्यालय धर्माबाद, एच.डी. बनसोडे सध्या कार्यरत कृषी अधिकारी कार्यालय मुखेड, कृषी पर्यवेक्षक एस.व्ही. दबडे सध्या तालुका कृषी अधिकारी मुखेड, आर.एम. पाटणकर तालुका कृषी अधिकारी मुखेड, जे. डी. पवार सध्या कार्यरत मुखेड, एस.एच. कचकलवार सध्या कार्यरत मुखेड,श्रीमती आर. जी. पवार सध्या कार्यरत लोहा कृषी पर्यवेक्षक कार्यालय,आर.पी. जाधव सध्या कार्यरत पूर्णा जिल्हा परभणी,एस.बी. बैस सेवानिवृत्त, आर. जे. चव्हाण तालुका कृषी अधिकारी नायगाव,एच.पी. नव्हारे तालुका कृषी अधिकारी नायगाव, ज्ञानेश्वर माधवराव गुट्टे ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र मुखेड, विष्णुकांत माळजी मुंडे वैष्णवी इरिगेशन मुखेड, संजीव छत्रपती पवळे सुमित पाटील इरिगेशन कंधार, आणि काही लाभार्थी शेतकरी ज्यांची नावे माहीत नाहीत अशा सर्व लोकांची नावे आरोपी सदरात आहेत