नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याने चोरलेला 3 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर हेड जप्त केला आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी आपल्या कार्यालयातील पोलीस उपनिरिक्षक व्ही.एस.पुयड, नागनाथ तुकडे, पोलीस अंमलदार किशन मुळे, तिरुपती तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, अमोल घेवारे आदींना भोकर वळण रस्त्यावर पाठविले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने भोकर वळण रस्त्यावर पंढरी गंगाधर अन्नरवाड (45) रा.सावरगाव मेट ता.भोकर यास ताब्यात घेतले. त्याने विचारपुस केल्यानंतर सांगितले की, 13 मार्च 2025 रोजी भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ट्रॅक्टर हेड चोरले आहे. हे ट्रॅक्टर हेड उमरी ते भोकर रोडवर चोरीला गेले होते. त्या संदर्भाने गुन्हा क्रमांक 113/2025 भोकर पोलीस ठाण्यात दाखल होता. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पंढरी गंगाधर अन्नरवाडने चोरलेला 3 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर हेड जप्त केला आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याकडून चोरीचा 3 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर हेड जप्त केला
