सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांना कार्यमुुक्त न करण्याचे गौडबंगाल काय?

नांदेड(प्रतिनिधी)-बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांना जवळपास एक वर्षापासून नांदेडमध्ये सांभाळून ठेवण्यामागे काय गौडबंगाल आहे. नदी पलिकडूनच्या कार्यालयातून सुध्दा आर्शिवाद मिळत आहे काय? अशी चर्चा आता व्हायला लागली आहे.
नांदेड येथे उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांची बदली अगोदर नागपूर शहर येथे लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी झाली होती. तरी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यानंतर निवडणुक आचार संहिता आली. निवडणुक आचार संहितेत ही बदली निवडणुकीच्या पुर्वी झालेली आहे. म्हणून त्या आचार संहितेनुसार त्यांना नांदेडमध्ये ठेवले तर काही होत नाही. या आधारे ते येथेच राहिले. त्यानंतर त्यांनी 146 वर्षानंतर आलेल्या कुंभमेळ्यात स्नान करून आपली बदली छत्रपती संभाजीनगर येथे करून घेतली. तरी पण त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. दरम्यान 10 फेबु्रवारी रोजी नांदेडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख चंद्रकिशोर मिणा यांनी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांना त्या तपासाच्या मदतीसाठी बोलावले. त्या तपासात चंद्रकांत पवार यांनी काम केले. पण तरीही ते छत्रपती संभाजीनगर ऐवजी नांदेड जिल्ह्यातून त्या कामासाठी गेले होते.
दरम्यान तीन पोलीस अंमलदारांची बदली काही विशेष कारणाने माहुर येथे करण्यात आली. त्यावेळी वास्तव न्युज लाईव्हने कर्मचाऱ्यांना सुध्दा कार्यमुक्त करणार कि नाही किंवा त्यांना सहाय्यक पोलीस निरिक्षकांसारखी सवलत मिळेल काय अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मात्र माहुर येथे रवाना करण्यात आले आहे आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांची सुरू असलेली सुविधा आजही कायमच आहे. काय असेल या मागचे गौडबंगाल हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!