2026 मध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी छत्रपती शिवाजी राजे विरुध्द औरंगजेब हा देखावा तयार करण्यात आला

भारता असणाऱ्या आज परिस्थितीनुसार 2026 मध्ये मध्यावती निवडणुका होणार आहेत. आणि याच पार्श्र्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांनी मिळून औरंगजेब विरुध्द छत्रपती शिवाजी राजे असा देखावा तयार केला आहे आणि या देखाव्यात छत्रपती संभाजी राजांना जोडले आहे. कारण सध्या डी लिमिटेशन (परिसिमन) संदर्भाने कायदा येणार आहे. हा कायदा आणण्याच्या परिस्थिती सरकार आज नाही. म्हणून 2026 मध्ये मध्यावती निवडणुकीशिवाय पर्याय नाही असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
ऍड. प्रकाश आंबेडकर सांगत होते. आयोध्या पार्श्र्वभूमीवरच भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस या दोघांनी अगोदर राज्यांच्या निवडणुक जिंकल्या आणि पुढे देशाची निवडणुक जिंकली आणि ते देशावर राज्यकर्ते झाले. माझ्या दृष्टीकोणातनू आता आयोध्या हा विषय संपला आहे आणि कोणताही नवीन विषय भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासमोर नाही. 1921 पासून ते आजपर्यंत आरएसएसचे व्यक्तीमत्व पाहिले तर त्यांनी स्वत:ला वाढविण्यासाठी धर्म आणि धर्मद्वेशाचा वापर केला आहे आणि त्यातूनच आयोधेचे प्रकरण पुढे आले आणि त्यांनी सत्ता जिंकली. मागील काही वर्षापासून औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज हा मुद्दा सुरू करण्यात आला. या दोघांना एकमेकांच्याविरुध्द उभे करणे सुरू झाले आहे. दोघे राजे होते. ते लढले राजे म्हणून पण आज औरंगजेब म्हणजे मुस्लमान आणि छत्रपती शिवाजी राजे हिंदु असा देखावा तयार केला जात आहे. अशा विरोधी शब्दांचे वाक्य तयार करून त्या पुढे छत्रपती संभाजी महाराजांना जोडले गेले. छत्रपती शिवाजी राजे आणि औरंगजेब यांच्या लढायांबद्दलचाा अभ्यास केला तर त्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचे पुर्ण राज्य औरंगजेब जिंकू शकला नाही आणि छत्रपती शिवाजी राजे औरंगजेबाला हारवू शकले नाहीत. म्हणूनच छत्रपती संभाजी राजांना जोडून यात धार्मिकता आणली गेली. छत्रपती संभाजी राजांना कोणी पकडून दिले. याच्यावर अजूनही संशोधनाची गरज आहे. परंतू मोगल राज्यात छत्रपती संभाजी राजांवर झालेला अत्याचार कु्रररच होता. पण तो अत्याचार धार्मिक दाखवला जात आहे. छावा चित्रपट आल्यानंतर राज्यात वातावरण तयार झाले असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर हे सांगतात हे झालेच असणार. छत्रपती संभाजी राजांवर मुस्लिम राजवटीत अत्याचार करण्यात आले हे खरे आहे. पण ते धार्मिक अत्याचार नव्हे तर सत्तेसाठी अत्याचार आहेत. छत्रपती संभाजी राजांना कोणी पकडून दिले, त्यांची सुपारी काय होती आणि कोणी ही सुपारी दिली होती. याचे संशोधन सुध्दा आवश्यक असे ऍड. प्रकाश आंबेडकरांना वाटते.
छत्रपती संभाजी राजांना पकडल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी सुध्दा बरेच प्रयत्न झाले. ज्या ठिकाणी संभाजी राजांना कैदत ठेवले होते. त्या ठिकाणी स्वाऱ्या झाल्या. हा ईतिहास का लपविला जात आहे असा प्रश्न आपल्या मुलाखतीत ऍड. प्रकाश आंबेडकरांनी विचारला. त्याबद्दल ते पुढे सांगतात. छत्रपती संभाजी राजांना मोगलांनी अटक केली. तो पर्यंत पेशवाई आली होती. ज्या सरदारांनी छत्रपती संभाजी राजांना सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांना पाठींबा का मिळाला नाही असा प्रश्न ऍड. प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. बहुदा त्यावेळेस छत्रपती संभाजी राजे संपले तर छत्रपती शिवाजी राजांचे राज्य संपेल असा विचार असेल. आजही राजकारणात तेच चालत असते असे ऍड.प्रकाश आंबेडकर म्हणाले.
माझ्या मते 2026 मध्ये भारतीय जनता पार्टीला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील. म्हणूनच डि लिमिटेशन अर्थात परिसिमन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात तेलंगणा, ओरीसा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांचा समावेश होणार आहे. यात गुजरात वगळता सर्वच राज्य परिसिमनचे विरोधक आहेत आणि हे सर्व विरोधात गेलेच तर मध्यावधी निवडणुकांशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही आणि म्हणूनच औरंगजेब विरुध्द छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती संभाजी राजे यांना राज्याच्या लढाई व्यतिरिक्त धार्मिक लढाई असे चित्र तयार केले जात आहे.
महाराष्ट्राची लोकसंख्या 12 ते 13 कोटी आहे. यात 4.5 कोटी लोक महाराष्ट्रा व्यतिरिक्तचे आहे. म्हणजे खरी महाराष्ट्राची लोकसंख्या 9 कोटी आहे. ममता बॅनर्जीने उभे केलेे आंदोलन अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्ये त्यांनी विचारणा केली आहे की, एकाच ईपीक नंबरचे मतदार वेगवेगळ्या राज्यात कसे आहेत. याचे उत्तर केंद्र सरकारकडे नाही. परंतू केंद्र सरकारकडे समोर हा प्रश्न आहे की, राज्यांचे परिसिमन केले नाही तर राज्य चालूच शकत नाही. ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, अमित शाहला काय कळते? भयंकर बहुमत असल्याने सर्व काही दाबले जात आहे, बदलले जात आहे. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांचे सर्व खेळ आता बाहेर येत आहेत. म्हणूनच 2026 मध्ये मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या तर छत्रपती शिवाजी राजे हे दक्षीणचे राजे नव्हते तर ते देशाचे राजे होते असा देखावा तयार केला जात आहे आणि त्यांच्या विरुध्दचा औरंगजेब असा हा प्रयत्न सुरू आहे. 2026 मध्ये मध्यावधी निवडणुका आल्याच तर त्या अगोदर 7 ते 8 महिन्यापुर्वी कुल्ताबादमधील औरंगजेबाची कबर उध्दवस्त झालेली असेल असे ऍड. प्रकाश आंबेडकर सांगतात. ऍड. आंबेडकरांच्या मते कोणी हिटलर वाचला असेल तर त्यांच्या लक्षात येईल की, हिटलर आणि आरएसएस यांच्या पध्दती तसुभर सुध्दा फरक नाही. म्हणजे मुद्या उभारायचा, वेगळे पणा होवू द्यायचा आणि शेवटी तुर्तास आम्ही थांबतो असे म्हणायचे हीच पध्दत आज देशात सुरू आहे. आज दिशा सालीयन हा मुद्दा उपस्थित झाला आहे. यासंदर्भाने राजकीय विचार करा. ज्या प्रकरणात उध्दव ठाकरे यांच्या पुत्राचे नाव येत आहे. अशा परिस्थितीत उध्दव ठाकरे मोदीविरुध्द काय भुमिका घेतली. आत्महत्या आणि खून याचे वकील म्हणून विश्लेषण करतांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की आत्महत्या करणारा आणि ढकलून खून झालेला हा प्रकार वेगळाच दिसतो. त्यामुळे दिशा सालीयन हे प्रकरण आज मोठे ऱ्हस्य आहे. आजच्या परिस्थितीत दिशा सालीयन यांनी आत्महत्या केली की तो खून आहे हे स्पष्ट झालेले नाही.
आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये फुल-शाहु-आंबेडकर विचारांचे पुढे काय होईल. यावर बोलतांना ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले कॉंगे्रस, राष्ट्रवादी कॉंगे्रस आणि शिवसेना यांनी काय भुमिका घ्यावी हे नरेंद्र मोदी ठरवतात. कारण या प्रत्येकांच्या मागे त्यांनी सिसेमिरा लावलेला आहे. ज्याला स्वतंत्र भुमिका घेवून राजकीय लढाई लढायची आहे. तो म्हणजे फक्त फुले-शाहु-आंबेडकर विचारांचा व्यक्ती करू शकतो असे ऍड.प्रकाश आंबेडकर यंानी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!