नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारीतेत माझ्यासारखा कोणी पत्रकार नव्हता असा अहंभाव ठेवणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकारासह इतर काही जणांविरुध्द एका महिलेने मला त्रास देत असल्याची तक्रार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली आहे. इतर पत्रकारांच्याविरुध्द काड्या करणे आणि कैकयीसारखे कृत्य करणे हेच यांच्या जीवनाचे ध्येय आहे. तक्रार करणाऱ्या महिलेने स्वाक्षरी आपले पुर्ण नाव लिहुन केली आहे.
मातोश्री अपार्टमेंट, पुंडलिकवाडी, महाविर चौक नांदेड येथे राहणाऱ्या महिला सौ.उषादेवी नंदकिशोर आग्रवाल यांनी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 4 आणि पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे वजिराबाद यांना एक अर्ज दिला आहे. या अर्जात नमुद घटनेप्रमाणे त्यांचे निवासी संकुल तळमजल्यावर क्रमांक 1 हे आहे. त्या निवासी संकुलाच्यावर राहणारे विनायक एकबोटे, सतिश पोटपेलवार, उमाकांत हमपोले, गोटु शर्मा आणि इतर निवासी संकुलधारक यांची एक टिम आहे आणि ते दररोज कचरा आणून माझ्या घरासमोर ठेवत आहेत. त्यामध्ये सॅनेटरी नॅपकिन,डायपर असतात. त्यामुळे त्यातून दुर्गंधी पसरत आहे. मी माझ्यावतीने त्यांना विनंती केली की, कचऱ्याची गाडी आली तेंव्हा कचरा आणून टाकत जा. पण ते ऐकत नाहीत. मला व माझ्या कुटूंबियांना घाणीच्या साम्राज्यात ठेवत आहेत. अशा प्रकारे निवासी संकुलधारक मला त्रास देत आहेत.
यापुर्वीसुध्दा विनायक एकबोटे हे मी मोठा पत्रकार आहे. म्हणून मला धमकी देत होते. सगळे अधिकारी माझे आहेत असे सांगत होते. इतर लोकांना माझ्याविरुध्द उचकावणे, भांडणे लावणे, माझ्याविरुध्द चिथावणी देणे असे प्रकार ते करत आहेत. त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. माझ्या व माझ्या कुटूंबियांच्या जीवनात होणारा शारिरीक व मानसिक त्रास यास पत्रकार विनायक एकबोटेसह इतर सर्व लोक जबाबदार राहतील म्हणून त्यांच्याविरुध्द कडक कार्यवाही करावी असे या निवेदनात लिहिले आहे. विनायक एकबोटे यांनी आता पत्रकारीतेतून काम सोडले आहे. पण त्यांचे सुपूत्र त्यांनी मैदानात आणले आहेत. तरी पण घरी बसल्या बसल्या दोन-चार परिच्छेद लिहुन व्हाटसऍपवर आपले विचार प्रदर्शित करत पत्रकारीता सुरूच आहे. आपल्या मुलासाठी मुलांसारख्या असलेल्या इतर पत्रकारांबद्दल रामायणातील कैकयीची भुमिका वठवत आहेत. काय म्हणावे आता कारण आम्ही काही म्हटले तर आम्ही देशद्रोही ठरवले जातो.
पत्रकार एकबोटेसह काही जणांविरुध्द महिलेची तक्रार
