नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीस ठाण्याचे हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालीकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीविरुद्ध तामसा पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजही अल्पवयीन बालिकांचे संरक्षण हा प्रश्न पोक्सो कायद्याच्या अंमलबजावाणीनंतर सुध्दा डोंगरासारखा प्रश्न आहे.
एका 13 वर्षीय बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार मागील 2 महिन्यापासून त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा एक 58 वर्षीय व्यक्ती त्यांच्या 13 वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करत असल्याची कुणकुण त्यांना लागली. त्यानंतर त्या बालिकेच्या आई-वडीलांनी मिळून त्या 58 वर्षीय व्यक्तीला असे न करण्याबाबत सुचना केली. तरी पण त्यामध्ये काही फरक पडला नाही आणि त्याचे चाळे सुरूच होते. अखेर तामसा पोलीसांनी कांताराव नारायण शेखदार (58) या कंत्राटदाराविरुध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून बालिकांच्या संरक्षण या प्रश्नावर अर्धविराम जरुर लावला आहे. पण बालिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकारावर कधी पुर्णविराम लागेल याचे उत्तर मिळत नाही. खरे तर चुकीचे काम करणाऱ्यांना पोलीस या शब्दानेच भिती वाटली पाहिजे. पण तसा काही प्रकार नांदेड जिल्ह्यात दिसत नाही. म्हणूनच 58 वर्षीय व्यक्तीने एका 13 वर्षीय बालिकेसोबत हा घाणेरडा प्रकार घडविला आहे. आपल्या बालिकांच्या सुरक्षेसंदर्भाने फक्त कायद्यावर अंवलंबून न राहता समाजात सुध्दा या संदर्भाने जागृती होण्याची गरज आहे. तामसा येथे दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सहदेव खेडकर हे करणार आहेत.
तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; गुन्हा दाखल
