अर्धापूर पोलीस ठाण्यात 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत श्रमदान आणि स्वच्छता

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यात आज राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या संकल्पनेतील स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी स्वच्छता ही आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचा सल्ला पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी आपल्या सर्व अधिकारी व अंमलदारांना दिला.
स्वच्छता मोहिम राबविणे हे आजच्या परिस्थितीतील एक आवश्यक काम आहे. ज्यासाठी संत गाडगे बाबा यांनी आजपासून अनेक वर्षापुर्वी ही संकल्पना गावोगाव राबवली. या संकल्पनेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वत:च्या हातात झाडू घेवून काम केले. देशात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवली जाते. अशीच मोहिम पोलीस ठाणे अर्धापूर येथे राबवली असतांना काही अंमलदार गैरहजर राहत आहेत ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस निरिक्षक कदम यांनी आपल्या सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदारांना संदेश दिला की, श्रमदान करणे आणि स्वच्छता बाळगणे ही कल्पना माझी नसून राष्ट्रपुरूष श्री.गाडगेबाबा यांची आहे. त्यांनी ही संकल्पना समाजात रुजवली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा यासाठी झटत असतात. महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस या संकल्पनेत सुध्दा स्वच्छतेला महत्व दिले गेले आहे. तेंव्हा श्रमदानात गैरहजर राहणाऱ्या पोलीस अंमलदारांनी हे लक्षात घ्यावे की, त्यांच्या प्रत्येक चुकीची नोंद स्टेशन डायरीमध्ये घेतली जाईल. जेणे करून त्यांच्या जीवनात काही समस्या येणार नाही याचे लक्ष ठेवून स्वच्छता मोहिमेत आणि श्रमदान मोहिमेत सहभाग घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!