नांदेड(प्रतिनिधी)-शेताच्या शेडमध्ये ठेवलेले 12 क्विंटल हरभरा पिक 66 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी चोरल्या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विरभद्र बाबाराव हसनपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मार्चच्या सायंकाळी 6.30 ते 15 मार्चच्या सकाळी 5 वाजेदरम्यान मौजे कुंटूर फाटा रस्त्यालगत ता.नायगाव येथे त्यांच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये ठेवलेले 12 क्विंटल हरभरा पिक किंमत 66 हजार रुपये कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. कुंटूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 57/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कंधारे अधिक तपास करीत आहेत.
12 क्विंटल हरभरा पिक चोरले
