नांदेड(प्रतिनिधी)-धुळवड साजरी करतांना काही मित्रांनी आपल्याच मित्राचा खून केल्याचा प्रकार हस्सापूर पुलाजवळ 14 मार्चच्या दुपार ते 15 मार्चच्या दुपारदरम्यान घडला आहे. या प्रकरणातील आरोपी नांदेड ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.
पंचशिलनगर नांदेडमध्ये राहणाऱ्या महिला शोभाबाई राजू वावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मार्च रोजी दुपारी त्यांचा मुलगा अर्जून राजू वावळे(22) हा आपले मित्र राम सदाशिव जाधव, उध्दव भास्कर नरवाडे, ललन उर्फ सतिश कंधारे, अश्र्विन लोणे, कार्तिक भगवान भिसे आणि विक्की यांच्यासोबत धुळवड साजरी करतांना हस्सापूर शिवारात गेला होता. त्या ठिकाणी त्या मित्रांनीच गळ्यावर, डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा करून त्याचा खून केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 261/2025 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन गढवे हे करीत आहेत. प्राप्त माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी अर्जून वावळेच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
मित्रांनीच मित्राचा खून केला
