नांदेड(प्रतिनिधी)-गाईला राज्यमातेचा दर्जा प्राप्त करून दिल्यानंतर त्यांच्या संगोपणासाठी शासनाने निधी पण दिलेला आहे. या निधीचा दुरूपयोग कसा होता. कोल्हा ता.मुदखेड येथील गोशाळेतून समोर आले. ही गोशाळा वीज वितरण कंपनीमध्ये डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंठेवाड यांच्या मालकीची आहे अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला. त्यानंतर त्यांच्या संगोपणासाठी, देखभालीसाठी निधी पण नियोजित केला. या निधीचा उपयोग अनेक गोशाळेंमधून घेतला जात असतो म्हणे. पण कोल्हा ता.मुदखेड येथे असलेल्या गोशाळेत एका गायीचा मृत्यू झाला आहे. सोबतच त्या गोशाळेत असणाऱ्या ईतर राज्यमाता अर्थात गायींची अवस्था अत्यंत दुर्देवी आहे. गाईंना पाहिले असता त्यांची हाडे बाहेर दिसत आहेत. एक वासुर तेथे दिसले त्याला योग्यरितीने चालता सुध्दा येत नव्हते. मग हा शासनाच्या निधीचा गैरवापरच नव्हे काय? असा प्रश्न त्या गोशाळेची परिस्थिती पाहिल्यावर लक्षात येतो. ही गोशाळा कोणाची आहे याची महिती घेतली तेंव्हा वीज वितरण कंपनीमध्ये डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोण्या कंत्राटदार कंठेवाड यांची ही गोशाळा असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. एखाद्या शेतकऱ्याने घेतलेले कर्ज काही नैसर्गिक आपत्तीमुळे फेडू शकला नाही. तर त्याविरुध्द शासनाच्यावतीने अशी कार्यवाही केली जाते की, शेतकरी आत्महत्या करतो. या गोशाळाप्रकरणात राज्यमातांची हेळसांड होत असतांना, मृत्यू होतांना त्या व्यक्तीवर काही कार्यवाही होईल की, नाही असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.