400 वर्षापुर्वीच्या औरंगजेबाची आठवण करून आज हिंदु मुस्लीम हे विष पेरण्याचे कारस्थान सुरू असतांना दोन वर्षापुर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळेस औरंगजेबाकडे माफी मागितल्याचे वक्तव्य केले होते. औरंगजेबाला आठवण करून आज सामाजिक शांतता बिघडविण्याचा जो प्रकार सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य लोकांनी खा.सुधांशु त्रिवेदीला हे सुध्दा विचारायला हवे की, दाखव ते पाच माफिनामे. मुगल काळात ज्या हिंदु सरदारांनी त्यांची सेवा केली. त्या सेवेकरी सरदारांचे वंशज आज शासनात उच्च पदांवर भारतीवर जनता पार्टीमुळे आहेत आणि त्या मोगलांचे सेवेकरी असलेल्या सरदारांच्या वंशजांकडून आम्हाला देशप्रेम शिकावे लागत आहे. हा दुर्देवी प्रकार आहे.
नव्यानेच छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात काही सरदारांच्या वंशजांनी उचलेल्या आक्षेपानंतर छावा चित्रपटाच्या निर्देशकाने माफी पण मागितली होती. याच निर्देशकाच्या निर्दशनाप्रमाणे छावा चित्रपटात दाखवलेला घटनाक्रम असा आहे की, मुगलांनी मराठ्यांचा खजिना लुटला आणि तो खनिजा असीरगड किल्याजवळ पुरून टाकला. आसिरगड किल्ला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर या जिल्ह्यात आहे आणि जी जागा चित्रपट दाखवली ती जागा हारुन शेख यांची आहे. चित्रपटातील दृश्यांप्रमाणे आज त्या ठिकाणी लोक खोदकाम करत आहेत. त्यांच्या मेहनतीला अद्याप तर काही फळ आले नाही. पण त्यांच्या मनाला पटलेल्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या मेहनतीला काही तरी फळ येईल. काही सोन्याचे सिख्ये काही चांदीचे सिख्ये, काही मोती, काही हिरे, काही नगिने यापैकी एक जरी सापडला तरी आमच्या जीवनाचे भले होईल. म्हणजे आज सिनेमा खरा वाटत आहेत. मुगलांनी लुटलेला खजिना तेथे गाडलाही असेल. तर ती बाब छावा चित्रपटाच्या निर्देशकाला कळली. पण त्या भागात राहणाऱ्या लोकांना माहित नसेल काय? बरे पुरला असेल तर काढला नसेल काय? छावा चित्रपटातील एका दृश्यात औरंगजेब येतो तेंव्हा एका चित्रपटगृहात प्रेक्षकांनी पडदा फाडून औरंगजेबाचा मुडदा पाडला. एक युवती चित्रपटगृहातच भावूक झाली आणि छत्रपती संभाजी राजांचा जयजयकार करू लागली. छत्रपती संभाजी राजांच्या जयजयकाराला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. आम्ही सुध्दा छत्रपती संभाजी राजांचा जयजयकारच करतो. पण दुसरा एक प्रसंग या संदर्भाने महत्वपूर्ण आहे. सिनेमागृहात पाच युवक आपसात काही तरी बोलतांना चित्रपट पाहणारा बहुतांश जमाव त्यांच्या विरुध्द झाला. कारण त्या जमावाला असे वाटले असेल की, छत्रपती संभाजी राजांच्या विषयाकडे यांचे दुर्लक्ष आहे. पण त्या युवकांचा विचार वेगळा असेल. नंतर त्यांना गुढघ्यावर बसवून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायला लावली. पण जमावातील एकाला लक्षात आले की,चित्रपट छत्रपती संभाजी राजांवर आहे. मग त्यांना छत्रपती संभाजी राजांची माफी मागायला लावली. वाचकांना वा टत असेल. ते युवक मुुस्लमान असतील. नाही त्यांची नावे सुशांत, आशुतोष, संजय, गौरव, आणि आयुष्यमान अशी होती.
भारतीय जनता पार्टीच्या संकेतस्थळावर यदुनाथ सरकार यांची पुस्तक अपलोड केलेली आहे. त्यावर आधारीत विश्लेषण आम्ही सुध्दा काल प्रसारीत केले होते. 400 वर्षापुर्वीच्या औरंगजेबाची आठवण करून आज सुरू असणारा वाद ठिक आहे ज्याचा त्याचा विचार असेल. पण आमच्या मते तो हिंदु-मुस्लिम विष कालवणीचा प्रकार आहे. कारण छत्रपतींच्या राज्यात झालेल्या लढाया या धार्मिक नव्हत्या. तर त्या सत्तेसाठी होत्या आणि म्हणूनच यदुनाथ सरकार यांच्या पुस्तकात उपलब्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्राचा उल्लेख महत्वपुर्ण आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अकबराला जगदगुरू म्हणत आहेत. पण भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता असलेले आणि नेहमीच घाण बोलण्याची सवय असणारे खा.सुधांशु त्रिवेदी यांनी सुध्दा सन 2022 मध्ये वि.दा.सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितलेल्या एका चर्चेदरम्यान त्रिवेदी यांना एक प्रश्न विचारण्यात आला. की, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती. याचे समर्पक उत्तर न देता त्रिवेदी यांनी त्यात काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा पाच वेळेस औरंगजेबाची माफी मागितली होती असे वक्तव्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणे हे भाजपचे कामच नाही. परंतू छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त आमचाच हक्क आहे हे दाखवण्यात मात्र ते कमी राहत नाहीत. वि.दा.सावरकरांनी आपल्या पुस्तकात असे लिहिलेले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम महिलांना पकडून आणल्यानंतर त्यांना सहज सोडत होते. त्यामुळेच ते कमजोर झाले. याचा अर्थ वि.दा.सावरकरांना छत्रपती शिवाजी राजांकडून होणारा मुस्लिम महिलांचा आदर आवडत नव्हता.म्हणूनच त्रिवेदी असे म्हणाले. कारण सावरकरांबाबतच्या चर्चेमध्ये त्यांनी सहजपणे छत्रपती शिवाजी राजांचा अनादर केला आणि याची विचारणा कोणीच त्यांना केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनाची निती, आपली चरित्र्य निती, आई मॉं जिजाऊ यांच्याकडून मिळालेल्या संस्कारावर आपले जीवन चालविले होते.
मध्यकाळामध्ये हिंदु-मुस्लिम हा वादच नव्हता. अनेक मुस्लिम राजांकडे हिंदु सरदार होते. अनेक हिंदु राजांकडे मुस्लिम सरदार होते. अकबराकडे सवाई मानसिंह , औरंगजेबाकडे त्यांचे वंशज मिर्झा राजे जयसिंह हे होते. मिर्झा राजे जयसिंह हे हिंदु होते ना मग ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यावतीने का लढे नाहीत. याच्यावर कोणी चर्चा करत नाही. आज मिर्झा राजे जयसिंह यांचे वंशज कु.दियासिंह या भारतीय जनता पार्टीच्या मेहरबानीने उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी विचारणा केली काय? याचा अर्थ असा आहे की, ज्यांनी मोगलांच्या काळात आणि इंग्रजांच्या काळात त्यांच्या सेवा केल्या. त्यांना मोठीच पदे मिळाली आणि झांशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवा, शेवटचा मोगल सम्राट बहादुरशाह जफर यांचे वंशज मात्र आज कोठेच दिसत नाहीत. कारण त्यांनी इंग्रजांसोबत मैत्री करार केलेला नव्हता. भोपाळच्या नवाबाचे राज्य गेले नाही. हैद्राबादच्या निजामाचे राज्य गेले नाही. कश्मिरचे डोगरा राज्य संपले नाही. कारण हे सर्व इंग्रजांचे सेवक होते.
आज आम्हाला मोगल राज्यात सेवा केलेले आणि इंग्रजांसोबत मैत्री करार केलेल्या लोकांच्या वंशजांकडून देशप्रेम शिकावे लागते काय? यात आमचे किती दुर्देव. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगात आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता असलेले खा.सुधांशु त्रिवेदी छत्रपतींच्या माफीनाम्या बद्दल बोलतात आणि तो माफीनामा एक नव्हे तर पाच शिवछत्रपतींच्या भक्तांनी नक्कीच हा प्रश्न सुधांशु त्रिवेदीला विचारायला हवा की, दाखव बाबा महाराजांचे ते पाच माफीनामे. बाकी आम्ही लिहिलेले विश्लेषण हे पुस्तकांच्या आधारावरच लिहिलेले आहे. खा.सुधांशु त्रिवेदींकडे काय आहे.
सोर्स-अशोक कुमार पांडेय