नांदेड (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या कामठा खुर्द ता. जि. नांदेड येथील मेन रोडवरील संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, ज्येष्ठ सामाजिक नेते व्यंकटराव दुधंबे, श्रीराम गोरे, प्रकाश गोरे, भीमराव वाघमारे, श्रीनिवास कांबळे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी या भूमिपूजन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक सर्व गावकरी मंडळी व चर्मकार समाज बांधव आणि सर्व गोरे व भाडेकर परिवार, कामठा खुर्द ता. जि. नांदेड यांनी केले आहे.
