नांदेड – आधुनिक भारताचे निर्माते , विश्वरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानांची मूल्य समाजात रुजवण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी येत्या 8 मार्च रोजी पक्ष प्रवेश सोहळा, संघटन समीक्षा बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी 12:00 वाजता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे अध्यक्षस्थानी प्रा. राजू सोनसळे राहणार आहेत . यावेळी नांदेड जिल्हा प्रभारी माधव दादा जमदाडे , सह प्रभारी प्रा.डॉ. सुनिल वाकेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
या बैठकीला नांदेड उत्तर भागातील रिपब्लिकन सेनेच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
