भारताच्या लोकशाहीत दंगल भडकवण्याचे काम काही पत्रकार करतात. खरे तर पत्रकारीता ही यासाठी नाही. ज्या लोकांचा आवाज उंच जात नाही. तो आवाज उंच पोहचविण्याची मुळ जबाबदारी पत्रकारांची आहे. ज्या पत्रकारांना देशात दोन समाजांमध्ये विष पेरुन पैसे कमवायचे आहेत. त्यापेक्षा त्यांनी विष पेरणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये सहभागी व्हावे त्या ठिकाणी त्यांना गडगंज संपत्ती कमावता येईल. देशाचे भले, जनता का प्रश्न, जनता पुछ रही है असे कार्यक्रम करून भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये. नाही तर या सुदृढ लोकशाहीला गृहण लागेल. आम्ही सुध्दा अशा लोकांच्या विरुध्द लिहितांना भिणार नाही आणि भविष्यात सुध्दा समाजाचे, देशाचे वाईट विचार करणाऱ्यांविरुध्द लिहिणारच आहोत. हा सर्व प्रकार परवा दि.4 फेबु्रवारी रोजी जम्मू काश्मिर महामार्गावर वाहनांच्या खोळंब्यामुळे आपल्या ट्रकच्या छतावर नमाज अदा करण्याच्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की, काही पत्रकार भारतात विष पेरण्याचेच काम करतात.
4 फेबु्रवारी रोजी एका वृत्तवाहिनीने ट्रकपर नमाजी या आशयाची एक बातमी प्रसिध्द केली. या बातमीमध्ये दिसणारे फुटेज असे आहे की, असंख्य वाहने एका रांगेत उभी आहेत आणि एका ट्रकवर त्या ट्रकचा चालक अथवा मालक जो कोणी असेल नमाजची वेळ झाल्याने आपल्या ट्रकच्या छतावर नमाज अदा करत आहेत. सोबतच या व्हिडीओमध्ये एक शेजारचा रस्ता दाखवला. त्यावर एकही गाडी नाही आणि महिला अँकरने असे सांगितले की, या नमाजीने भर महामार्गावर मध्यभागी आपली ट्रक उभी करून नमाज अदा केली. ज्यामुळे अनेक वाहनांचा खोळंबा झाला आणि मोठा ट्राफीक जाम झाला. मागे कधी तरी एक ट्रक ड्रायव्हरने रस्त्यावर ट्रक उभा करून गुजरामध्ये नमाज अदा केली होती. त्याला अटक झाल्याचेही सांगण्यात आले. हा व्हिडीओ सामाजिक संकेतस्थळावर व्हायरल झाला आणि त्या व्हायरल व्हिडीओची बातमी वृत्तवाहिनीने प्रसारीत केली. 5 फेबु्रवारी रोजी एका चुकीच्या बातमीवर एका जागरूक नागरीकाने दुसरा व्हिडीओ बनविला आणि त्यांनी सांगितले की, आजही वाहनांची लाईन लागलेली आहे. काल सुध्दा होती. काल रिकामा असलेल्या शेजारचा रस्ता आजही रिकामाच आहे. तेंव्हा पत्रकारांनी कृपा करून खरे शोधून खरी बातमी लिहावी. खोट्या बातम्या लिहुन विष प्रसारीत करू नये. दुसरा व्हिडीओ बनविणाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे आणि व्हिडीओप्रमाणे त्या ठिकाणी वातावरणातील अस्पष्टता आणि भुस्खलन यामुळे ट्राफीक जाम झाला होता आणि या जाममध्ये नमाजची वेळ झाली म्हणून त्या ट्रक चालकाने आपल्या ट्रकच्या छतावर नमाज अदा केली.या ठिकाणी रिकामा दिसणारा रस्ता तो रस्ता बनवणाऱ्या कंत्राटदार कंपनीनेच बंद ठेवलेला आहे. हेही सत्य त्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये समोर आले.
ट्रकच्या छतावर नमाज अदा करणे हा काही गुन्हा आहे काय? या ट्रक चालकाने रस्ता आडवून असा प्रकार घडविला असता तर त्या ठिकाणी थांबलेले इतर हजारो वाहने आणि त्यातील हजारो लोक गप्प बसले असते काय? पण वृत्तवाहिनीला आपला टीआरपी वाढविण्यासाठी आणि देशात जातीयतेचे विष प्रसरविण्यासाठी मिळणारे पैसे याला कारणीभूत आहेत. अंतरराष्ट्रीय स्तरावर स्टॅलिस्टा या बातम्यांचे सत्य शोधणाऱ्या संस्थेने आणि त्यातील खरे तथ्य तपासण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या या संस्थेने सर्वात जास्त खोट्या न्युज जगामध्ये भारतातून प्रसारीत होतात असे दाखवले आहे. त्याने आपल्या प्रसिध्दीमध्ये जगाच्या नकाशात सर्वात जास्त लाल रंगाचे ठिपके भारत देशावर दाखवले आहेत.
ट्रकपर नमाजी, ब्रिज की होली में मुसलमानो का क्या काम, रमजान से पहले कितने व्हिलचेअरपर बैठ, ताज महल मे दिखा शिवलिंग हुवा जलाभिषेक , जामा मस्जिद भाईजान की रंगाईवाली जिद्द, कुंभ के बाद रमाजान योगी का टार्गेट क्लिअर, मस्जिदपर रंग रोगन गडबडी करेंगे भाईजान, कुर्बानी फ्रि बकरी ईद मनाईंगे भाईजान, औरंगजेब की कबर का काऊंटडाऊन शुरू, संबल में आयोध्या जैसा न्याय, मदर से पर ऍक्शन भाई जान को क्यो टेंशन, बोले भाईजान लाऊड हो नमाज अशा या कार्यक्रमांच्या हेडींग आहेत आणि हे कार्यक्रम देशहित, जनता की आवाज, जनता पुछ रही है, ताल ठोक के अशा सदरांखाली प्रसारीत केले जात आहेत. या प्रत्येक मथळ्यात जनतेला काय विचारायचे आहे. यात देशहित काय आहे. हे त्यांनी सिध्द करून दाखवले तर आम्हाला सुध्दा त्यांच्याविरुध्द बोलण्याचा हक्क राहणार नाही. पण यामुळे आपल्याच सणांची बदनामी होत आहे. याचे भान सुध्दा या वृत्तवाहिन्यांना राहिलेले नाही. कोरोना काळामध्ये तबलिकी जमात बद्दल याच पत्रकारांनी कितीघाणेरडा प्रचार केला होता. परंतू छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालय खंडपिठाने तबलिकी जमातला या आरोपातून मुक्त केले होते की, पाकिस्तानच्या सांगण्यावरून ते भारतात कोरोना पसरवित आहेत. सोबतच त्या पत्रकारंाविरुध्द ओढलेला ताशेरा अत्यंत भयंकर होता. त्या प्रमाणे काही पत्रकारांनी संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत मोठ्या प्रमाणात दुरूपयोग केला आहे. देशाच्या हितासाठी तर खरी पत्रकारीता करायची आहे आणि यात देशहित काय ? यामुळे समाजात विष कालवले जात आहे. परवाच एका उच्च भु्र सोसायटीमध्ये एका 3 वर्षाच्या हिंदु बालिकेने आपल्या सोसायटीत राहणाऱ्या त्याच वयोगटातील मुस्लिम बालिकेला सांगितले की, माझ्या आईने सांगितले आहे की, तुम्ही मुस्लिम आहात म्हणून मी तुमच्यासोबत सोसायटीमधल्या सार्वजनिक ठिकाणी खेळणार नाही. काय दिसते यातून आणि अशा विष पसरविणाऱ्या बातम्या पाहुन आमच्या डोक्याची मानसिकता दुसरीकडे जात आहे आणि आमच्या बालकांचे भविष्य अंधारात फेकत आहोत.
पत्रकारीतेपेक्षा अशा पत्रकारांनी एखाद्या विष पसरविणाऱ्या राजकीय पक्षाचे सदस्य व्हावे. तर विष पसरविणारी पत्रकारीता करून त्यांना जी रक्कम मिळत आहे त्यापेक्षा खुप मोठी रक्कम राजकीय पक्षात मिळेल. आम्हाला असेही वाटते की, घरी जाऊन हे पत्रकार आपल्या बालकांना कसे सांगत असतील की, मी आज खोटी बातमी प्रसारीत करून आलो. देशात विष पसरेल असे वक्तव्य करून आलो. या विष पसरविणाऱ्या पत्रकारांमध्ये एक पत्रकार असाही आहे की, जो रामलिला कार्यक्रमांमध्ये रामाचे पात्र वठवतो. मर्यादा पुरूषोत्तम राम यांचे पात्र लोकांसाठी दाखवत असतांना त्यातील एक कण सुध्दा या पत्रकारामध्ये कसा आला नसेल आणि म्हणतात हिंदु खतरे में है। वाचकांनो असे चॅनल पाहु नका ज्यामुळे आपल्या मनात, समाजाच्या मनात, देशाच्या मनात विष पसरेल. आम्ही सुध्दा मोठ्या ताकतवान लोकांविरुध्द लिहितो आहोत पण आम्ही त्याला भिणार नाही आणि देशाच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी आम्ही आमचे विद्रोही लिखाण थांबवणार नाही.
सोर्स: अभिसार शर्मा…