नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या पश्चिम दिशेकडे आणि उताराजवळ असणाऱ्या एका दवाखान्यात पी.सी.पी.एन.डी.टी.विभागाची मंडळी पोहचली. आता ती कशासाठी पोहचली याचा शोध घेण्याची होड पत्रकारांमध्ये लागली. पण पत्रकारांना जोपर्यंत कोणतीही गोष्ट स्पष्टपणे कळत नाही.किंबहुना दाखवली जात नाही. तोपर्यंत पत्रकार कमी धोका पत्कारतात आणि माहित झालच तर लपवण्यासाठी कधी-कधी मदत करतात. वास्तव न्युज लाईव्हने आजच दुबईमध्ये फाशी दिल्यानंतर आज दफनविधी झाल्याची बातमी प्रसारीत केली आहे. दुबईच्या प्रकरणात सुध्दा भारत सरकारने काही केले नाही. काल घडलेल्या नांदेडच्या प्रकरणात सुध्दा नांदेड प्रशासनाने काही केलेले नाही. का केले नसेल याचा शोध घ्यायला. थोडासा वेळ लागेल.
काल सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास काही पत्रकारांना अशी माहिती मिळाली की, पी.सी.पी.एन.डी.टी.चे अधिकारी हॉस्पीटलमध्ये आले आहेत.पी.सी.पी.एन.डी.टी.हा कायदा आहे. तो गर्भातील बाळाचे लिंग जाणून घेण्यावर प्रतिबंध करतो. तसेच लिंग आवडीचे नसेल तर ते भ्रूण काढून टाकण्यासाठी प्रतिबंध करतो. पी.सी.पी.एन.डी.टी.ची मंडळी आहे. म्हणजे आम्हाला बातमी आहे असा साधा समज पत्रकारांचा झाला. कारण या अगोदर पी.सी.पी.एन.डी.टी.ने केलेल्या अनेक कार्यवाह्या पत्रकारांना बोलावून सांगितल्या होत्या. पत्रकार त्या दवाखान्या पोहचताच खळबळ माजली आणि हळुहळू कोणी-कोणाला फोन करू लागले, कोणी फोन करून आमुक माणसाला बोला असे म्हणून लागले. यातच पी.सी.पी.एन.डी.टी.ची अधिकारी मंडळी पोलीस ठाण्यात पोहचली. सर्वसाधारण पणे पत्रकारांना अत्यंत हसून बोलणारे पोलीस अधिकारी तटस्थपणा दाखवत होते. तर काही जण मी नाही त्यातली असा भाव आणून हात वर करत होते. तर काही जण आपल्याच कानावर हात ठेवत होते. पत्रकारांना सुध्दा आश्चर्य झाले. सायंकाळी 4 ते रात्री 11 या वेळेपर्यंत बातमीचा पाठलाग करून बातमी मिळाली नाही याचे नैराश्य पत्रकारांना आलेच.
आलेल्याा नैराश्याचे परिमार्जन झाले नाही तर पत्रकाराला रात्री झोप येत नसते. म्हणून काही पत्रकारांना एका वरिष्ठ आणि उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी सुध्दा पी.सी.पी.एन.डी.टी.या विभागाकडे बोट दाखवून त्यांना विचारा असे म्हटले. आता तर पत्रकारांना रात्रभर झोप आलीच नाही. भारतीय पुरातत्व विभागाप्रमाणे पत्रकारांनी आज खोदकाम सुरू केले. या खोदकामात ही बाब पत्रकारांच्या लक्षात आली की, किंबहुना कोणी तरी त्यांना सांगितले. पी.सी.पी.एन.डी.टी.च्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार आली होती. की, अमुक या दवाखान्यात भु्रण हत्येचा प्रकार घडत आहे. म्हणून पी.सी.पी.एन.डी.टी.ची टीम तेथे गेली. पण त्या पी.सी.पी.एन.डी.टी.च्या टिमला असे कळले म्हणे की, तेथे ऍडमिट असलेल्या दवाखान्यात महिलेच्या गर्भातील भू्रणाची वाढ ऍबनॉरमल आहे. पण दवाखान्यात काही झाले नाही. हा काही न झाल्याचा चेंडू सरकारी दवाखान्याच्या नावावर फेकून देण्यात आला. काही पोलीस मात्र सांगतात पी.सी.पी.एन.डी.टी.ची टीम गुन्हा दाखल करायलाच आली होती. पण अद्याप आम्ही वृत्त प्रसारीत करेपर्यंत कोणताही गुन्हा कुठेच दाखल झाला आम्हाला तरी कळला नाही. आम्ही सुध्दा या प्रकरणाची माहिती सरकारी दवाखान्यात घ्यायचा प्रयत्न केला. पण आमचे यश आमच्यापासून दुरच राहिले. त्यामुळे आज तरी आम्ही काही लिहिण्याच्या परिस्थितीत नाही.
आजच वास्तव न्युज लाईव्हने 13 दिवसांपुर्वी दुबईमध्ये फाशी देण्यात आलेल्या एक असहाय्य युवतीची बातमी लिहिली आहे. त्या बातमीत केंद्र सरकार त्या युवतीला वाचवू शकले असते. पण प्रयत्नच केले नाहीत असे आमचे मत आहे. आमचे व्यक्त करण्याचा अधिकारी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 ने आम्हाला दिलेला आहे. त्याचप्रमाणे कालच्या या भू्रण प्रकरणात नांदेड प्रशासनाने सुध्दा काहीच केलेले नाही. हे सुध्दा आमचेच मत आहे.
खासगी दवाखान्यात घडलेला भ्रूणहत्येचा प्रकार कसा दाबला गेला?
