नांदेड :- PCPNDT कायद्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तालुकास्तरीय सर्व सामुचित प्राधिकारी यांचा एक दिवसीय कार्यशाळा/ उजळणी प्रशिक्षण दिनांक 04 मार्च 2025 रोजी नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डॉ.निळकंठ भोसीकर यांनी आयोजित केली.
सदरील कार्यशाळेस मा. जिल्हाधिकारी नांदेड श्री राहुल कर्डीले यांनी मार्गदर्शन केले आणि धडक मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
सदरच्या कार्यशाळे अंतर्गत पीसीपीएनडीटी कायद्याबाबत डॉ. अन्सारी यांनी मार्गदर्शन केले तर डॉ.संजय पेरके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी सोनोग्राफी सेंटर कसे तपासावे याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सुधीर देशमुख – अधिष्ठाता डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड तर डॉ.श्यामराव वाकोडे – विभाग प्रमुख स्त्रीरोग विभाग डॉ.शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड तसेच डॉ. फसीहा मॅडम व डॉ सुप्रिया पंडित – वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका नांदेड हे उपस्थित होते.सदरील कार्यशाळेच्या आयोजनाकरिता डॉ.विद्या झिने, डॉ.राजाभाऊ बूट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी व डॉ. एच. के. साखरे तसेच ॲड.पूजा राठोर PCPNDT विधी समुपदेशक, श्री. सचिन पानपट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.