नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद येथे 27 ग्रॅम सोन्याची सोनसाखळी 51 वर्षीय महिलेच्या गळ्यातून बळजबरीने चोरून नेली आहे.
श्रीमती बालमणी लक्ष्मण कत्तरोजू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 फेबु्रवारी रोजी सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास त्या देविगल्ली धर्माबाद येथे आपल्या घरासमोर उभ्या असतांना दोन अज्ञात आरोपी दुचाकीवर आले आणि त्यांनी बालमणीच्या गळ्यातील 27 ग्रॅम सोन्याची साखळी किंमत 1 लाख 50 हजार रुपयांची(जुन्या वापराची) बळजबरीने हिसकावून नेली आहे. धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 53/2025 नुसार दाखल केली आहे. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
27 ग्रॅम सोन्याची साखळी बळजबरीने चोरली
