पुण्यातील स्वारगेट बसस्थानक अत्यंत गर्दीची जागा आहे. या गर्दीच्या ठिकाणी एका माथेफिरूने एका 26 वर्षीय युवतीला ताई..ताई असे उल्लेखीत करून तिला शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना महाराष्ट्रात महिला सुरक्षीत आहे काय? यावर प्रश्न उपस्थित करते. स्वारगेट पोलीसांनी त्याच्या छायाचित्रासह जनतेला आवाहन केले आहे की, हा आरोपी दिसला तर त्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्यात द्या.
दि.22 फेबु्रवारी रोजी शनिवारी एक 26 वर्षीय युवती आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी सकाळी 5.30 वाजता स्वारगेट बसस्थानकात आली. त्यावेळी पुर्णपणे उजेड पडला नव्हता. तेथेच थांबलेल्या युवकाने ताई कोठे जायचे आहे असे सांगून ओळख करून घेतली आणि युवतीने सांगितलेल्या गावाकडे जाणाऱ्या बस इकडे थांबत नसतात तिकडे थांबतात असे सांगून तिला सोबत नेले आणि अनेक बसेसच्या मागे थांबलेल्या शिवशाही बसजवळ नेले. युवती नोकरी करणारी आहे. म्हणून तीने बसमध्ये लाईट लागले नाहीत हा प्रश्न विचारला तेंव्हा त्या माथेफिरूने ताई तु मध्ये जाऊन बग सगळी मंडळी झोपली आहे. बस चालक आणि वाहक आले की, ते लाईट चालू करतील. शिवशाहीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा एक दरवाजा असतो. युवतीने मधला दरवाजा उघडण्याअगोदरच या युवकाने बसच्या पहिल्या प्रवेशद्वारातून आत येवून ते दार बंद करून टाकले आणि युवतीला मागच्या दारातून आत ढकलले. शिवशाही बस ही वातानुकूलीत असते म्हणून त्यात होणारा आवाज सुध्दा बाहेर आला नसेल आणि त्या नराधमाने त्या युवतीवर अत्याचार करून पळून गेला.
घटनेची माहिती स्वारगेट पोलीसांना मिळताच. पोलीसांनी त्वरीत कार्यवाही केली. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अत्याचार करणाऱ्याची ओळख पटवली. त्याचे नाव दत्तात्रय रामदास गाडे (27) रा.गुनाट ता.शिरुर ता.पुणे असे आहे. या दत्तात्रयावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे नाव उघड झालेच आणि पोलीसांनी त्या संदर्भाची शोध पत्रिका जाहीर करून माहिती सांगणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देवू अशी घोषणा सुध्दा केली. पण एवढ्यावर महिला सुरक्षा संपते काय? स्वारगेट बसस्थानकात रात्रीच्या वेळी 100-150 पेक्षा जास्त बसेस थांबलेल्या असतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे. कोण त्या बसवर लक्ष ठेवते. त्या बसमध्ये घडलेला हा प्रकार युवतीने सार्वजनिक केला. पण सार्वजनिक झालेले असे किती प्रकार घडले असतील. पोलीस दररोज रात्रीची गस्त करतात. त्यांच्या रात्रीच्या गाड्या नक्कीच स्वारगेट बसस्थानकाच्या समोरून जात असतील. पण पोलीसांनी कधी बसस्थानकात चक्कर मारली काय? कारण त्यांची चक्कर सुध्दा गुन्हेगारांवर जरब आणत असते. किंवा या घटनेला असे म्हणून टाळता येईल काय की मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये छोट्या-छोट्या घटना घडत असतात. एका माजी मुख्यमंत्र्यांने सुध्दा बलात्कार प्रकरणात युवक से गलती हुई असे सांगून बलात्कार प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता.
विधानसभा निवडणुकीपुर्वीपासून लाडकी बहिण योजना राबवून राज्य शासनाने आम्ही महिलांची चिंता किती करतो हे दाखवले. त्याचे फळ सुध्दा त्यांना मिळाले. पण महिला सुरक्षेचे काय? आज या युवतीवर घडलेला प्रसंग कसा घडला, का घडला, कोण जबाबदार या घटनेला याची जबाबदारी कोण निश्चित करील. विधानसभा निवडणुकीपुर्वी बेलापूरमध्ये अल्पवयीन बालिकेसोबत घडलेला प्रकार महाराष्ट्र विसरलेला नाही. त्या प्रकारातील आरोपी पळून जाऊ लागला म्हणून पोलीसांनी त्याला गोळ्या मारल्या आणि तो मरण पावला. हा प्रकार सुध्दा त्या बेलापूरमधील इतरांची नावे येवू नये म्हणून घडविला होता काय ? असा व्हिडीओ निखिल वागळे यांनी बनवला होता. त्याचे उत्तर सुध्दा सरकारने काही दिले नाही. त्यावेळी आपले शरीर विकणाऱ्या महिलांनी जाहीर पणे कॅमेऱ्यासमोर सांगितले होते की, तुमच्याकडे पैसे नसतील तर आमच्याकडे या आम्ही तुमची मोफत सेवा करू पण अल्पवयीन बालिकांना त्रास देवू नका. सरकार पेक्षा तर सेक्सवर्कर महिलांची तारीफ करायला हवी. ज्यांनी एवढी हिम्मत दाखवली आणि सरकारने त्या आरोपीला मारून टाकून विषय संपवला. अशीच सुरक्षा महिलांची होणार आहे का? म्हणूच माझ्या वडीलांनी मला खेळण्यासाठी कधी बाहुली घेवून दिली नाही. कारण महिला या खेळण्याच्या वस्तु नाहीत.
लाडकी बहिण योजना राबविणाऱ्या सरकारच्या तोंडावर चपराक मारून एका माथेफिरूने स्वारगेट बसस्थानक प्रकरण घडविले
