नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मरळक येथून एका शेताच्या आखाड्यावर बांधलेल्या दोन गाई आणि यएक गोरा असे 70 हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरीला गेले आहे.
सौ.सिमा पांडूरंग शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मरळक येथील त्यांच्या शेताच्या आखाड्यावर दोन गाई आणि एक गोरा असे पशुधन बांधलेले होते. 26 फेबु्रवारीच्या सकाळी 6.30 वाजेच्यावेळेपर्यंत त्यांच्या शेतात बांधलेले 70 हजार रुपये किंमतीचे पशुधन कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहे. लिंबगाव पोलीसांनी ही घटना 18/2025 प्रमाणे दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार पवार यांच्याकडे दिला आहे.
मरळक येथे पशुधन चोरी
