वाढदिवसाचे अभिष्टचिंतन..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे हे समाजाला दिशा देण्याचे कार्य करणारे युवा कार्येकर्ते असून ते सामाजिकतेचे भान जपणारे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकांच्या सुख दुःखात धावून जाणारा हा कार्यकर्ता असून बंटी लांडगे यांच्या मातोश्री सौ कमलताई गोविंदराव लाडंगे या राष्ट्रवादीच्या कट्टर कार्यकर्त्या आहेत. त्यांचा वारसा बंटी लांडगे सक्षमपणे चालवत आहेत. केवळ राजकारण न करता ते सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी तत्परतेने सोडवण्यासाठी पुढे येतात…
सर्वसामान्यांशी डायरेक्ट कनेक्ट असलेला कार्यकर्ता …!

नांदेड शहरातील जुन्या काळातील वैभव असलेल्या नांदेड टेक्सटाईल मिल च्या परिसरात लहानाचे मोठे झालेले बंटी लाडंगे हे आपल्या कार्यकर्त्ववार आजरोजी मित्र परिवारासह सगळीकडेच मदतीला धावून जाणारा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात ..
त्यांचा जन्म हा एनटीसी मिल् मध्ये कर्मचारी असलेल्या गोविंदराव लाडंगे यांच्या घरी झाला घरात दोन , भाऊ व तिन बहीणी असे मोठे कुंटूब होते , आपले बालपण हे कष्टाच्या स्थितीत गेल्यामुळे सर्व सामान्यांच्या प्रश्नाची त्यांना विशेष जाण आहे .. ते गोदावरी काठावर वसलेल्या देगाव चाळ-गंगा चाळ या परिसरातील मूळ रहीवाशी असल्याने त्यांना या भागातील नागरी समस्यांची चांगली जाण आहे यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली आहे…
प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करताच स्वतःला विविध सामाजिक कार्यात मध्ये झोकून दिले कारण त्यांनी अगदी बालवयापासून मिल गेट परिसरात वेळोवेळी उद्धभवणारी पूर परिस्थिती,साथीच्या आजाराचे थैमान,पसरणारे घाणीचे साम्राज्य या बाबी अगदी जवळून बघितल्या आहेत मग यावर उपाय करायचा तर आपल्याला थेट मैदानात उतरावे लागेल यातून त्यांच्या सामाजिक कार्याला सुरूवात झाली असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात..
त्यांच्या राजकीय वाटचालीवर त्यांच्या आई सौ कमलताई गोविंदराव लाडंगे यांचा मोठा प्रभाव असल्याचे ते कबूल करतांनाच नमूद करतात की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आमच्या मातोश्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आहेत व त्याच वाटचालीत आदरणीय शरद पवार साहेब, मा. कमलकिशोर साहेब तसेच डॉ.सुनिल कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपलेही सामाजिक कार्य सुरू आहे ..
देगाव चाळ – गंगा चाळ परिसरातील रहीवाशांच्या हक्कासाठी कायम प्रयत्नशिल..

बंटी लाडंगे यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवातच ही मूळात प्रभाग क्रमांक १८ मधील नागरी समस्यांपासून केली आहे मागील २० वर्षापेक्षा जास्त काळापासून ते या भागातील नागरीकांच्या हक्कासाठी शासन दरबारी झगडत असतात त्यांनी सामाजिक कार्याबरोबर येथील बांधवांसाठी न्यायिक लढा उभा केलेला आहे..यातून येथील ३५०० घरगुती महीलांना लेबर जॉब कार्डची व्यवस्था असो का मिल प्रशासनाच्या विरोधातील औरंगाबाद खंडपिठातील याचिका,येथील रहीवाशांना कायम स्वरुपीचे मालमत्ता हक्क प्रमाणपत्र असो असे एक ना अनेक कार्य त्यांनी त्यांच्या माध्यमातून पार पाडले आहेत…
प्रभागातील ठळक विकासकामे – स्व-खर्चातून ….!
-स्वखर्चातून बुद्ध विहार बांधकाम करण्यात आले
-गरजूंसाठी मोफत मध्ये 24 तास ॲम्बुलन्स सेवा सुरू केली
-स्वखर्चातून प्रभागांमध्ये दोन बोर पाडण्यात आल्या
-साडेतीन हजार महिलांना लांडगे यांच्या नेतृत्वात लेबर कार्ड काढून देण्यात आले
-पूर परिस्थिती दरम्यान अन्नदान व कीट वाटप करण्यात आल्या
-लॉकडाऊन च्या काळात सॅनिटायझर मास्क व राशन किट वाटप करण्यात आली
दरवर्षी रमजान ईद निमित्त सर्वधर्म समभाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते येत
-प्रभागांमध्ये धूर फवारणी करण्यात आली
-लॉकडाऊन झाल्यानंतर पूर्ण प्रभागांमध्ये सॅनिटायझर करण्यात आले
— प्रभागातील महिलांसाठी वेगवेगळे खेळ व पारितोषिक देण्याचे काम करतात
-खास महिलांसाठी होम मिनिस्टर चा कार्यक्रम घेण्यात आला व पैठणी व सोन्याचे बक्षीस देण्यात आले
-त्रिपिटक बुद्ध विहार समितीच्या माध्यमातून प्रभागातील अनेकांना वेगवेगळी मदत पुरवण्याचे कार्य करत असतात
· तरुणांसाठी रोजगार मेळावा ..
· व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन
· पूरपरिस्थीती निर्माण होऊन घरात पाणी शिरू नये यासाठी संरक्षक भिंतीची मागणी
· सिडको येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी अल्पदरात अभ्यासिकेची व्यवस्था
· वार्डात नाले-सफाई व प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी सातत्याने पुढाकार
ठळक सामाजिक कार्य ..!
· सर्व धर्मीय धर्मगुरूंना सोबत घेत सर्व धर्मात सलोखा ठेवणारा ईद ए मिलाप कार्यक्रमाचे आयोजन
· दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन
· लोक कलावंताची प्रशासनाकडे नोंद व्हावी असा उभारलेला यशस्वी लढा..
· डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन..
· माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन
· पूरग्रस्तांना व सर्वसामान्यांना अन्नदान वाटप व भंडाऱ्याचे आयोजन
· वेळोवेळी हॉस्पिटल, पोलिस स्टेशन यासारख्या प्रश्नासाठी रात्री बेरात्री धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख…
आम्ही शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ – बंटी लांडगे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील बंडानंतर येथील निष्ठावान कार्यकर्ते पक्ष अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यासोबत असून येणाऱ्या काळात नांदेडमध्ये पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
जनसामान्यात पत गमावलेल्या भारतीय जनता पार्टीने ईडीने, सीबीआयच्या माध्यमातून फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. त्यांच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह काही जणांनी पक्ष अध्यक्ष यांची साथ सोडून सत्ताधारी भाजपसोबत जाऊन मंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली आहे.
त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथे बोलाविलेल्या बैठकीसाठी नांदेड येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री कमलकिशोर कदम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते मुंबई येथे गेले होते. मुंबई येथे शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील आदी वरिष्ठ नेतेमंडळींची भेट घेऊन नांदेड येथील कार्यकर्ते राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत, असा विश्वास देण्यात आला आहे.
नांदेड काँग्रेस शहरातही हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी पार्टीसोबत असून येणाऱ्या काळातही कार्यकर्ते पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहतील, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शरद पवार यांनी सर्वच समाजातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे भाजपकडून राज्यात जातीयवाद पसरविण्याचे काम सुरू आहे.
मुस्लिम, दलित व ओबीसी समाजातील सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तींना वेगवेगळ्या पदावर संधी देण्यात आली. हे केवळ राष्ट्रवादी पक्षच करू शकतो. शरद पवारांच्या विचारातून कार्यकर्ते प्रेरित असून येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या विचारांवर पक्षाची जडणघडण होईल, त्यांच्यासोबत नांदेड येथील निष्ठावंत कार्यकर्ता असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
अशा सर्व सामान्यांशी नाळ असलेल्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आणि पुढील दमदार वाटचालीसाठी मनस्वी सदिच्छा..!
शब्दाकंन – मारोती सवंडकर, नांदेड
९८५०३०४२९७