नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासकीय कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्यात 3 टक्के दरवाढ 1 जुलै 2024 पासून देण्यात यावी असा शासन निर्णय राज्याच्या वित्त विभागाने आज जारी केला आहे. यावर वित्त विभागाचे उपसचिव विनायक धोत्रे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
राज्य शासकीय व इतर पात्र पुर्णकालीक कर्मचाऱ्यांना अनुज्ञय असणारा महागाई भत्ता सुधारीत करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. दि.1 जुलै 2024 पासून सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत वेतन संरचनेतील मुळ वेतानावरील अनुज्ञय महागाई भत्याचा दर 50 टक्केवरून 53 टक्के करण्यात यावा. ही महागाई भत्ता वाढ 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह फेबु्रवारी 2025 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी असे या आदेशात म्हटले आहे. हा शासन निर्णय राज्य शासनाने संकेतांक 202502251553358405 नुसार राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
महागाई भत्ता 3 टक्यांनी वाढला
