दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव घालणार – राहुल साळवे 

नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्था असो की नागरी स्वराज्य संस्था असो कि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन असो हे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने तसेच आमदार खासदार निधी सुद्धा दिव्यांगांवर खर्च केला जात नसल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा घेराव घालण्यात येणार आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असल्यामुळे त्यांना शेकडो दिव्यांगांसह घेराव घालणार असल्याचा इशारा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे,या निवेदनात साळवे यांनी असे म्हटले आहे की, आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव निधी शासन निर्णय निर्गमित झाला तेंव्हापासून अद्याप खर्च करण्यात आला नाही, राज्याच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी कुठलीच वाढिव निधीची तरतूद करण्यात येत नाही, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन वाढविणे तर दुरच जे आहे ते मानधन सुद्धा लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाही,डिपीडीसीच्या एकुण विकास निधीत दिव्यांगांसाठी १ टक्के राखीव निधी न ठेवता तो ५ टक्के राखीव निधी ठेवण्यात यावे यासह जिल्हा नियोजन समितीमध्ये दिव्यांगांना सदस्यत्व देण्यात यावे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून अद्याप दिव्यांगांवर निधी खर्चच केला नसल्यान्वये त्यांना शेकडो दिव्यांगांसह घेराव घालण्यात येणार असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!