नांदेड(प्रतिनिधी)-आमच्या मुलीवर वाईट नजर का ठेवतोस या कारणातून 15 जणांनी मिळून एका 21 वर्षीय युवकाचा खून केल्याचा प्रकार हदगाव येथे 21 फेबु्रवारी रोजी सायंकाळी घडला. या प्रकरणात हदगाव पोलीसांनी 15 जणांपैकी 11 जणांना अटक केली असून ते सर्व उद्या दि.24 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात अजून चार जणांना अटक करणे शिल्लक आहे.
मुमिनाबी शेख महेबुब (40) या गृहणीनीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर खुदबेनगर हदगाव येथे आहे. दि.21 फेबु्रवारी रोजी सायंकाळी जेवन तयार झाल्यावर घराबाहेर लाकडावर बसलेला मुलगा शेख अरफात शेख महेबुब (21) यास जेवन करण्यासाठी सांगितले. त्यावेळी तो घरी येवू लागला. त्याच गल्ली राहणारे रम्या संभा काळे, पम्या संभा काळे, साहेबराव संभा काळे, कृष्णा साहेबराव काळे, पत्रकार राजू खानजोडे, संभा काळे, शेषा मस्के, सुशिल खानजोडे, प्रदीप पंडीत, सिमा संभा काळेची मुलगी, वंदना काळे, जिजाबाई मस्के, प्रियंका काळे, वच्छला काळे, ओमकार काळे या सर्वांनी एकत्रीतपणे माझ्या पोराला तु आमच्या पोरीच्या मागे लागून तिला का त्रास देत आहेत, आमच्या मुलीवर वाईट नजर का ठेवत आहेस. आता तु आम्ही ठार मारतो असे सांगून या जमावाने हातात चाकू घेवून माझ्या मुलावर हल्ला केला. त्याच्या शरिरावर अनेक जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हदगाव पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 151(2), 351(3), 189(2), 190, 191 (2),191(3) आणि 103(1) प्रमाणे गुन्हा क्रमांक 52/2025 दाखल केला. हदगाव येथील पोलीस उपनिरिक्षक उमेश रायबाळे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला.
प्रकरण गंभीर होते, त्यामुळे पोलीसांनी मोठी हालचाल करून परमेश्र्वर उर्फ पम्या संभाजी काळे (28), रामराव उर्फ रम्या संभाजी काळे(32), कृष्णा साहेबराव काळे(22), ओमकार दिलीप काळे (20), प्रदीप कचरू पंडीत (34), सुशिल संजय खानजोडे (25), संजय विठ्ठल खानजोडे (48), सिमा राजू केदार(25), वंदना साहेबराव काळे (40), प्रियंका साहेबराव काळे (19) आणि शशांक उर्फ शेष्या तुकाराम मस्के (23) या 11 जणांना घटना घडल्यावर लवकरच अटक केली आणि काल दि.22 फेबु्रवारी रोजी न्यायालयात हजर केले. तपासाच्या प्रगतीसाठी न्यायालयाने पकडलेल्या 11 जणांना दोन दिवस अर्थात 24 फेबु्रवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील एफआयआर प्रमाणे अजून चार जणांना अटक करणे शिल्लक आहे.
मुलीला त्रास देणाऱ्या युवकाचा जमावाकडून खून ; 11 जण पोलीस कोेठडीत
