अमेरिकेच्या संस्थेत ट्रेनिंग घेवून नरेंद्र मोदी अमेरिकेच्या भविष्याची सुरक्षा करतात काय

युएसएआयडीचा निधी, जॉर्ज सोरोसचे नाव लिहुन विरोधी पक्षांवर टिका करणाऱ्या भारतीय जनता पार्टीची पोल त्यांच्याच व्हाटसऍप कुलगुरूने उघड केली. भयंकर प्रकार समोर आला की, 1993-94 म्हणजे जवळपास 32 वर्षापुर्वी अमेरिकेच्या एसीवायपीएल या संस्थेत नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षण घेतल्याची माहिती प्राप्त झाली. जे पैसे आपल्या देशात आलेच नाही त्यावर ओरड करणाऱ्या अशिक्षितांना हे समजले पाहिजे की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प काय करत आहेत. मोदी स्वत: एसीवायपीएलच्या प्रशिक्षणासारखा प्रशिक्षण कार्यक्रम मी भारतात सुरू करू इच्छीतो हे सांगितले म्हणजे त्यांच्या नंतर त्यांना अनेकांना अमेरिकेचे पिट्टू बनवायचे आहे काय? हा प्रश्न भारतीय जनतेला विचार करण्यासारखा आहे.

भारतीय जनता पार्टीचे व्हाटसऍप कुलगुरू अमित मालविय यांनी एक ट्विट करून भारतात येणाऱ्या 21 मिलियन डॉलरबद्दल चर्चा सुरु झाली. 21 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 184 कोटी रुपये होतात. एका पत्रकार परिषदेत ट्रम्प सांगतात की आम्ही असे पैसे दिले नाहीत आणि दुसऱ्याच दिवशी नवीन पत्रकार परिषदेमध्ये सांगतात मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांना 21 मिलियन डॉलर देणार आहे आणि ते पैसे भारतातल्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आहेत. काही पत्रकारांनी याचा शोध घेतला असता ते पैसे भारतात आलेच नाही तर ते बांग्लादेशमध्ये गेले. ते पैसे अशा एका प्रतिष्ठाणाला देण्यात आले. ज्यामध्ये फक्त दोन लोक काम करतात. पुढे बांग्लादेशाची सत्ता उलटली.
अमेरिकेत एक संस्था आहे जिचे नाव अमेरिकन कॉन्सील ऑफ यंग पॉलिटीकल लिडर्स(एसीवायपीएल) ही संस्था जगातील नेत्यांना अमेरिकेचे भविष्य सुरक्षीत ठेवण्यासाठी प्रशिक्षण देते या संस्थेमध्ये अमेरिका सरकार, फोर्ड फाऊंडेशन, रेड क्लिफ फाऊंडेशन, लेबनान, युएई कडून येणाऱ्या निधीच्या पैशांवर चालते. एसीवायपीएलच्या संकेतस्थळावर त्यांनी आजपर्यंत किती लोकांना अमेरिकेचे भविष्य सुरक्षीत ठेवण्यासाठी प्रशिक्षण दिले याची यादी आहे. या यादीमध्ये अमेरिकेच्या नेत्याशिवाय बाहेरचा नेता एकच आहे आणि तो नरेंद्र मोदी. 1966 पासून एसीवायपीएल काम करत आहे. तेथे प्रशिक्षण घेणाऱ्यांना अमेरिकेचे भविष्य सुरक्षीत ठेवण्यासाठी तयार केले जाते. म्हणजे नरेंद्र मोदी मागील 32 वर्षापुर्वीपासून हीच तयारी करीत आहेत काय? नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या भाषणात अमेरिकेच्या संसदेत सांगितले होते की, मी कोणत्याही पदावर नसतांना अमेरिकेत आलो होता आणि अमेरिकेत मी 51 राज्यांपैकी 29 राज्यांमध्ये दौरा केलेला आहे. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी काही वर्ष हिमालयात राहिले त्याप्रमाणे तेथे घडले नसेल हा दौरा एसीवायपीएलनेच घडविला असेल.


अमेरिकेत राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या डोनॉल्ड ट्रम्प यांचे मित्र उद्योगपती एलॉन मस्क यांनी सर्वात पहिली ठिंणगी 21 मिलियनची टाकली. मुळात ते पैसे भारतात आलेच नाहीत याचा अर्थ असा होतो की, दोन भावांनी आपसात डोके फोडले आणि ते भांडण न्यायालयात गेले. न्यायाधीशांनी विचारले काय झाले. भाऊ म्हणाले आमचे एक दुसऱ्याच्या शेजारी शेत आहे. एका भावाने सांगितले मी बैल घेणार आहे आणि बैल धुऱ्यावर बांधणार आहे तर दुसरा भाऊ म्हणाला की, तु लांब दोरी बांधशील मग तो माझ्या शेतात येईल आणि माझ्या शेताचे पिक खराब करेल. तेंव्हा पहिला म्हणाला मी बैल आणणारच आणि इथेच बांधणार आणि असा तो तुझ्या शेतात येईल. तेंव्हा दुसऱ्या भावाने लाकडाने पहिल्या भावाचे डोके फोडले. मग पहिल्याने दुसऱ्याचे फोडले आणि वाद न्यायालयात आणला. न्यायाधीशांनी विचारले की, बैल कोठे आहे. दोन्ही भाऊ म्हणाले बैल अजून खरेदीच केला नाही. असा हा 21 बिलियनचा प्रकार घडला आहे. पुढे ट्रम्पने मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 21 बिलियन डॉलर देणार आहे. काय खेळ आहे हे समजले काय? इलॉन मस्क पुढे इलेक्ट्रॉनिक गाड्या तयार करेल आणि त्या गाड्या भारतात विक्रीला येतील. असे अनेक उत्पाद तयार होतील आणि ते भारतात विक्रीला येतील मग मेक इन इंडियाचे काय होईल, स्टॅन्ड ऍप भारताचे काय होईल, आत्मनिर्भर भारताचे काय होईल. या प्रश्नाच्या उत्तरांना वाचकांनी शोधायचे आहे. कारण ही अफवा इलॉन मस्कने खोटी पसरविली होती आणि भारतात मोदीचे खरेदी केलेले पत्रकार म्हणतात आता मोदी गद्दारांना सोडणार नाही.


32 वर्षापुर्वी अमेरिकेच्या एसीवायपीएलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मोदीनी मागे पाहिलेच नाही. ते तीन दा गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि तिसऱ्यांना भारताचे पंतप्रधान झाले.भारतातील आरएसएसकडे ट्रेनिंग कमी पडली काय म्हणून मोदींना एसीवायपीएलकडे जावे लागले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताची अमेरिकेविरुध्द भुमिका होती आणि ती सुध्दा जागतिक स्तरावर. त्रयस्थ देशांची संघटना स्थापन करण्यामध्ये भारताचा सर्वात मोठा पुढाकार होता. जर ही प्रशिक्षण संस्था अमेरिकेच्या भविष्याला सुरक्षीत ठेवण्यासाठी ट्रेनिंग देते तर भारताच्या पंतप्रधानांना तेथे ट्रेनिंग घेण्याची गरज काय होती. त्यांनी तर भारताचे भविष्य सुरक्षीत पाहायला हवे. पुर्वी भारतीय जनता पार्टीची मंडळी, आरएसएसची मंडळी चिनमध्ये जाऊन कम्युनिष्ट पार्टीकडून प्रशिक्षण घेत होती आणि चिनचे लोक सुध्दा भारतात येवून प्रवचन देत होते. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी चिनला सुध्दा आपल्यापासून दुर ठेवले होते. भाजपचे लोक सांगतात 1993 मध्ये मोदी पर्यटक म्हणून गेले होते आणि ते फोटो सुध्दा त्यांनी स्वत: प्रसारीत केले आहेत आणि तशी ट्रेनिंग भारतात सुध्दा सुरू करण्याचा विचार असल्याचे मोदी म्हणाले. कारण त्या ट्रेनिंगनंतर मोदींची उन्नतीच होत गेली. अमेरिकेेच्या राष्ट्रपतीची स्टाईल आणि नरेंद्र मोदी यांची स्टाईल एकच आहे. शितल पिसींग नावाचे पत्रकार सांगतात युएसएआयडी आणि सोरोसच्या फंडींगवर बोलणारे एसीवायपीएलमध्ये ट्रेनिंग घेतात याचा विचार वाचकांनी करायाचा आहे. आपल्याच हाताने आपल्याच पायावर दगड मारून घेणे म्हणजे हा प्रकार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!