नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी एका 33 वर्षीय व्यक्तीकडून एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतूसे पकडली आहेत.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे, पोलीस उपनिरिक्षक सुनिल बुलंगे, व्ही.ए.बिक्कड, पोलीस अंमलदार शिवसांब मठपती, शेख इमरान, अरुण साखरे, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, भाऊसाहेब राठोड आणि ज्वालासिंग बावरी यांनी 21 फेबु्रवारी रोजी सायंकाळी गस्त करत असतांना आंध्र समिती शाळेच्या पाठीमागे राजूसिंग उर्फ राजू हरजितसिंग जाधव (33) यास विचारणा केली असता त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्तुल होती. सोबत तीन जीवंत काडतुसे होते.
पोलीस उपनिरिक्षक सुनिल मुंजाजीराव बुलंगे यांच्या तक्रारीवरुन राजूसिंग उर्फ राजू जाधव विरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 77/2025 दाखल केला आहे. गावठी पिस्तुल आणि जीवंत काडतुसे असा 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरिक्षक व्ही.ए.बिक्कड हे करणार आहेत.
वजिराबाद पोलीसांनी एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे पकडली
