नांदेड- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार 21 फेब्रुवारी 2025 रोजी हैद्राबाद येथून विमानाने रात्री 12 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. शनिवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा. शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे रोजगार मेळाव्यास उपस्थिती. सकाळी 11 वा. अर्धापूर येथून हिंगोलीकडे प्रयाण करतील.