भारतीय मुस्लिमांचा द्वेष आणि शेख अमिरला गळाभेट हेच आहे काय नरेंद्र मोदी यांचे वसुधैव कुटूंबकम

मेरिकेतून परत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बरेच अपमान अमेरिकेने केले आहेत. त्यात मोदी परत आल्यानंतर अमेरिकन वायुसेनेचे दोन विमान भारतात उतरले आणि त्या दोन्ही विमानांमध्ये हातकड्या आणि बेड्या लावलेली भारताचीच माणसे होती. याही मोठी संकट नरेंद्र मोदी यांच्यासमोर अमेरिकेने उभे केले आहे. त्यात सेक्युरीटीज ऍन्ड एक्सचेंज कमिशन न्युयॉर्कने एक पत्र भारत सरकारला पाठविले आहे आणि त्यात गौतम अडाणी, त्यांचा पुतण्या सागर अडाणी आणि इतर सहा जणांविरुध्दच्या फेडरल कोर्ट न्युयॉर्कने काढलेल्या नोटीसा त्यांना तामील करण्यासाठी मदत मागितली आहे. अमेरिकेत संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या पत्रकाराने विचारलेल्या अडाणी संदर्भाच्या प्रश्नावर भयंकर हातवारे करून हा व्यक्तीगत प्रकार आहे. असे सांगून वेळ मारुन नेली होती. परंतू आता सेक्युरीटीज ऍन्ड एक्सचेंज कमिशन (एसईसी) ने पाठविलेल्या पत्रावर कार्यवाही करण्याचे मोठे धर्मसंकट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अवाढव्य स्वरुपात उभे झाले आहे. एकीकडे भारतातील मुस्लिमांचा द्वेष आणि कतरच्या अमिरासाठी(भांडवलदार, मोठा व्यापारी, श्रीमंत व्यक्ती) प्रोटोकॉल तोडून भारताचे पंतप्रधान नरेेंद्र मोदी त्या अमिराचे स्वागत विमानासमोर जाऊन करतात. हा प्रकार सुध्दा नरेंद्र मोदीला कतर या देशात मिळालेल्या 49 टक्के हिस्सेदारीसाठी आहे. असे कसले वसुधैव कुटूंबकम.

Oplus_131072

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेहून परत आले. ते जाण्याअगोदर डोनॉल्ड ट्रम्पने 1977 च्या कायद्याला स्थगिती दिली. त्यावर अडाणी, मोदीच्या खरेदी केलेल्या मिडीयाने आता सर्व संपले. आता अडाणीचे काही होणार नाही, विरोधी पक्ष खोटा आरोप करत होता. अशा वावड्या उठविणाऱ्या बातम्या जोरदारपणे प्रसारीत केल्या. त्यानंतर मोदी अमेरिकेत गेले. अमेरिकेतून परत येतांना कॉफी टेबलवर पुस्तक भेट देतांना डोनॉल्ड ट्रम्प यांनी त्या पुस्तकावर महान व्यक्ती असे लिहिले होते. त्याचेही मोठे बाजारीकरण मोदीच्या मिडियाने केले. परंतू ते परत आल्यानंतर त्यांच्या जेवढ्या बेअब्रु अमेरिकेने केल्या. त्याला कोणीच प्रतिसाद देवू शकत नाही. अमेरिकेत जो बायडन यांचा पराभव आणि हिंडनबर्गला लागलेले टाळे म्हणजे अडाणीचा त्रास संपला असे मोठ-मोठ्याने ओरडणाऱ्या मिडियाला आता झटका बसला आहे.
18 फेबु्रवारी 2025 रोजी अमेरिकेच्या एसईसीचे पत्र भारताच्या विधीमंत्रालयात पोहचले आहे. त्यात 265 मिलियन डॉलरचा धोखा आणि भ्रष्टाचार बाबत भारत देशाकडून गौतम अडाणी, त्यांचे पुतणे सागर अडाणी आणि इतरांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी हे पत्र आहे. हे पत्र फेडरल कोर्ट न्युयॉर्कच्या अहवालावर आधारीत आहे. भारत सरकारच्या विधी मंत्रालयाने आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत गौतम अडाणी आणि इतरांवर नोटीस तामील करून देण्यासाठी मदत करावी असे या पत्रात म्हटले आहे. कारण गौतम अडाणी आणि इतर सर्व भारतात राहतात आणि ते अमेरिकेच्या ताब्यात नाहीत. आता हा मोठा धर्मसंकटाचा प्रश्न नरेंद्र मोदींसमोर येवून थांबला आहे.

Oplus_131072

अमेरिकेच्या दौऱ्यातून परत आल्यानंतर मोदींची वाहवाही पाहण्यात भारतीयांना बराच वेळ खर्च करावा लागला. पण अमेरिकेने सर्व काही उलटच केले. 2 सैन्य विमान अमेरिकेने भारतात पाठविले. त्यात हातकड्या आणि बेड्या लावलेलेच अवैध प्रवाशी भारतीयच होते. या उलट तेथे चिन देशातील 40 हजार अवैध प्रवाशी आहेत. त्यांच्यावर काही कार्यवाही करण्यात आली नाही. कोलंबियासारख्या छोट्याशा देशाने आपले प्रवाशी सन्मानाने परत आणले. सोबतच एफ-16 हे कबाड झालेले विमान खरेदी केले. मोदींसमोरच ब्रिक्स या संघटनेला ट्रम्पने मृत घोषित केले त्यावेळी हसत होते. दुर्देव म्हणजे बेड्या आणि हातकड्या घातलेल्या भारतीय नागरीकांचा व्हिडीओ व्हाईट हाऊसने स्वत: प्रसारीत केला आहे. हे सर्व घडत असतांना तेथे एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. तेथे एका अमेरिकन पत्रकाराने अडाणीवरच्या कार्यवाही संदर्भाने विचारलेल्या प्रश्नांना हाव-भाव अत्यंत रागात करून, हातवारे करून आम्ही वसुधैव कुटूंबकमची संस्कृती मानतो असे प्रवचन देऊन तो व्यक्तीगत विषय असल्याचे सांगितले आणि त्यासाठी 2 देशांचे प्रमुख भेटत नसतात, बोलत नसता असे म्हणाले. वाचकांनो विचार करा हाच प्रश्न भारताच्या पत्रकाराने विचारला असता तर त्या पत्रकाराची एखाद्या तासात नोकरी गेली असती किंवा अंधभक्त त्या पत्रकारावर तुटून पडले असते.
अडाणी विरुध्दचा खटला हा 1977 च्या कायद्याचा नाहीच. तो खटला एसईसीने दाखल केला आहे. एसईसी म्हणजे काय हे वाचकांना स्पष्ट व्हावे म्हणून आम्ही नमुद करू इच्छीतो की, भारतात सेबी जे काम करते तेच काम अमेरिकेत एसईसी करते. भारतात सेबीने माधवी बुच आणि अडाणीच्या संबंधाविषयी साधी चौकशी पण केली नाही म्हणजे 1977 चा कायदा ट्रम्पने स्थगित केला. म्हणजे अडाणी वाचला हा चुकीचा प्रचार होता हे एसईसीच्या पत्रानंतर स्पष्ट झाले आहे. त्यात विजेचा प्रकल्प उभारून हजारो माणसांना काम देणार आणि एवढ्या वर्षांमध्ये एवढा फायदा होणार असा दाखवलेला खोटा आधार या खटल्यासाठी कारणीभुत आहे. या विरुध्द भारतात भारतीय जनता पार्टी कॉंगे्रसवर आरोप करते की, ग्रीन एनर्जीकडून लाच घेणाऱ्यांमध्ये कॉंग्रेस सत्तेतील राज्यांचा समावेश आहे. मग करा की हो अटक त्या मुख्यमंत्र्यांना. तुम्हाला तर नेते तुरूंगात टाकण्यात मजा येते. परंतू यात अडचण अशी आहे की, लाच घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्र्याला तुरूंग दाखवला तर लाच देणाऱ्या अडाणीला सुध्दा तुरूंग दाखवावा लागेल. अशा या वावटळात नरेंद्र मोदी अडकले आहेत.

Oplus_131072

अडाणीवर नोटीस तामील करावी की, न करावी हा प्रश्न मोठा आहे. कारण नोटीस तामील केली तर कायदेशीर दृष्ट्या हेक कंव्हेनशनप्रमाणे पुढे अडाणीला अमेरिकेच्या मागणीप्रमाणे त्यांच्या ताब्यात सुध्दा द्यावे लागेल. यावर एक उपाय होवू शकतो. अडाणीविरुध्द येथेच अर्थात भारतात काही तरी चौकशी लावावी आणि ती चौकशी सुरू आहे असे सांगून नोटीस तामील करण्याची प्रक्रिया लांबवता येईल. पण हे किती दिवस हा प्रश्न आहे. अडाणी विरुध्द स्विर्झलॅन्डमध्ये 31 कोटी डॉलर फ्रिज करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियात गुन्हा दाखल झाला आहे. बांग्लादेशातील सर्वोच्च न्यायालयाने अडाणीच्या प्रकल्पांचे पुर्ननिरिक्षक करण्यास सांगितले आहे. श्रीलंका आणि केनियात सर्व करार रद्द झाले आहेत.अमेरिकेने भारताकडून येणाऱ्या वस्तुंवर टेरिफ वाढविल्यामुळे अनेक औषध कंपन्याचा कारभार धोक्यात आला आहे. त्यांना 2.25 बिलियन डॉलर सोसावे लागणार आहेत.
भारतात मुस्लिमांचा द्वेष आणि कतरचे अमिर शेख अल्दानी हे 17 फेबु्रवारी रोजी भारतात आले तेंव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी प्रोटोकॉल तोडून त्यांच्या स्वागतासाठी विमान गाठले. अमिर शेख अल्दानी हे राजकीय व्यक्ती नाहीत. फक्त भांडवलदार आहेत, श्रीमंत आहे, मोठे व्यावसायीक आहेत. का केले असेल नरेंद्र मोदी यांनी याचे उत्तर आहे. याचे उत्तर असे आहे की, 12 फेबु्रवारी 2025 रोजी अडाणीच्या हार्बर सर्व्हिसेस या कंपनीने शेख अमिर अल्दानीसोबत कतर देशामध्ये एक प्रकल्प उभारला. त्यामध्ये अडाणीची हिस्सेदारी 49 टक्यांची आहे. मग शेख अमिर अल्दानीला गळा भेट आणि भारतीय मुस्लिमांचा द्वेष असेच वसुधैवकुटूंबकम नरेंद्र मोदी यांचे आहे काय? असा प्रश्न आणि त्याचे उत्तराबाबत वाचकांनी विचार करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!