भारताच्या केंद्र सरकारला जेंव्हा आपल्या चुकांबद्दल समाधानकारक उत्तर देता येत नाही. त्यावेळेस ते प्रत्येक बाबीला पंडीत जवाहरलाल नेहरु ते खा.राहुल गांधी आणि कॉंगे्रस यांच्यावर दोषारोप करतात. आताच अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आले. त्याला अजून एक आठवडा पुर्ण झालेला नाही आणि खा.राहुल गांधी यांची बदनामी करण्यास सुरूवात करण्यात आली. मोदीच्या अमेरिका दौऱ्यातच याचे नियोजन करण्यात आले. पण सन 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी प्रत्येक घरात शौचालय दिले आहे. हे प्रत्येक लोकसभा मतदार संघात प्रचार सभेत जोर-जोरात सांगत होते. शौचालयांवर पंतप्रधान शौचालय असे बोर्ड पण लावले होते. हा पैसा काही भारताचा नव्हता. तो युएसएआयडी या संस्थेचा होता. जेंव्हा आपल्याला युएसएआयडीची गरज आहे. तेंव्हा त्याचा वापर केला आणि आपल्या घरगुती प्रश्नांवर उत्तर देता येत नाही तेंव्हा युएसएआयडीला खलनायक ठरवून त्याचे साथीदार राहुल गांधी आहेत हे दाखवले जाते अशी चालते भारतात लोकशाही. लोकशाहीची वाट लागली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत असतांना डोनॉल्ड ट्रम्पसोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारतातील काही चाटूकार पत्रकार सुध्दा होते. त्यातील एकाने ट्रम्प यांना विजयाचे अभिनंदन करतांना लाळ गळत होती. त्यावेळी डोनॉल्ड ट्रम्प सुध्दा हसले आणि नरेंद्र मोदींकडे पाहुन काही तरी विचारले. त्यावेळी त्या पत्रकाराने विचालेला प्रश्न असा होता की, युएसएआयडीने भारत आणि अमेरिकेच्या निवडणुकीत दखल दिला होता काय? तेंव्हा ट्रम्प म्हणाले की, आम्ही आता ईव्हीएम हटवून बॅलेटपेपरवर मतदान घेणार आहोत. ट्रम्पच्या या उत्तराने संपूर्ण भाजप हादरले. कारण भाजपवर अगोदर कॉंगे्रस ईव्हीएम संबंधाने आक्रमक आहेच आणि तेथेच बनला युएसएआयडीला खलनायक बनविण्याचा प्लॅन. याच पत्रकार परिषदेत दुसऱ्या एका पत्रकाराने बांग्लादेश येथील सत्तापालट बद्दल विचारलेल्या प्रश्नाला खोटा आणि अफवा करण्यााचा प्रकार असल्याचे सांगितले.
युएसएआयडी आज खलनायक आहे आणि त्या खलनायकाला खा.राहुल गांधी हे खलनायक मदतगार आहेत असे भारतीय जनता पार्टीने म्हणायला सुरूवात केली आहे आणि त्यांचे खरेदी केलेले पत्रकार हे दाखवत सुध्दा आहेत. भारतीय जनता पार्टीचा एक प्रवक्ता आलोक अजय याने हा खलनायकीचा आरोप केला. अजय आलोक खरा असेल तर त्याने एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे की, त्याने आपली दोन स्वत:ची मुले अमेरिकन नागरीक का बनवली आहेत. भारतात त्यांच्या मुलांना काही धोका आहे काय? हे वाचतांना वाचकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, युएसएआयडी काय आहे. युएसएआयडीचे संपुर्ण नाव युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असे आहे. ही संस्था जगभरात मानवाधिकार आणि देशाच्या विकासासाठी सहाय्य करते. अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ केनडी यांनी 1961 मध्ये शित युध्दाच्या कालखंडात या संस्थेची स्थापना केली. जगावरचा सोवियत युनियनचा प्रभाव कमी करण्यासाइी ही संस्था कार्यान्वीत करण्यात आली होती. ही संस्था जगभरात संघर्षरत असलेले देश, विकासशिल मार्गावर असलेले देश, राजकीय दृष्टीकोणाने महत्वपूर्ण देश यांना ही संस्था मदत करते. त्यात गरीबी, आजारपण,जेवण, आपत्ती, अशा कामांसाठी ही संस्था मदत करते. विकसनशिल देशांना वैश्वीक व्यापारात भाग घेण्याची त्यांची क्षमता तयार करण्यासाठी मदत करते. अशी आहे ही युएसएआयडी.
आज खा.राहुल गांधी यांना टार्गेटकरून करून त्यांना खलनायक बनवले जात आहे.परंतू सन 2022 मधल्या काही घटना वाचकांनी आठवल्या पाहिजे. ज्यामध्ये भारताचे विदेशमंत्री एस.जयशंकर यांचे पुत्र यांनी स्मृती इराणी यांची अमेरिकेत मुलाखत घेतली होती. त्यात मी युएसएआयडीची राजदुत असल्याचे सांगितले होते. म्हणजे जयशंकर यांचे पुत्र युएसएआयडीसोबत जोडलेले आहेत. त्याच वर्षी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युएसएआयडीसोबत कृषी, पाणी, वापरलेले पाणी आदी विषयांवर आम्ही सहकार्य करणार आहोत. ज्यावेळी नोटबंदी करण्यात आली. त्यावेळी युएसएआयडीच्या मदतीनेच वित्त मंत्रालयाने डिजिटल पेमेंटची भुमिका तयार केली होती. म्हणजे आता भारताच्या वित्त मंत्रालयाला सुध्दा खलनायक म्हणायचे काय ? एवढेच नव्हे तर निती आयोगाने सुध्दा युएसएआयडीसोबत अनेक योजनांमध्ये काम केले आहे. परंतू आरोप होतो तो खा.राहुल गांधींवर युएसएआयडीने दिलेल्या 182 मिलियन डॉलर कॉंगे्रसपक्षाच्या खिशात गेले नाहीत. तर भारताच्या अनेक योजनांच्या कामात लागले आणि त्या कामांना केंद्र सरकारने आम्ही केलेली कामे असे दाखवून वाह वाही मिळवली. परंतू लोकशाहीला निट मार्गावर चालविण्याची जबाबदारी असणाऱ्या मिडियाने मात्र भारतीय लोकशाहीचा विनोद करून टाकला आहे आणि सांगतात खा.राहुल गांधीमुळे भारताच्या लोकशाहीला धोका होत आहे.

सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी जेंव्हा अमेरिका यात्रेला गेले होते. त्यावेळी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत तत्कालीन उपराष्ट्रपती जो बायडन, अमेरिकेचे मुख्य सुरक्षा सल्लागार सुजान राईट, सचिव कॅरी आणि युएसएआयडीचे प्रमुख आणि पाचवे व्यक्ती होते नरेंद्र मोदी मग आज युएसएआयडीला खलनायक का बनवले जात आहे. त्यांच्याकडूनच पैसे घेतले, त्यांच्याच पैशांनी कोविड कालखंडात काम केले. कोविड वॅक्सीन घेतलेल्या लोकांना नरेंद्र मोदींचा फोटो लावून प्रमाणपत्र दिले. वारे देशाची लोकशाही. हर घर शौचालय ही योजना सुध्दा युएसएआयडीच्या पैशांची आहे. देशात 125 मागासलेल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु ते पंतप्रधान मनमोहनसिंघ या प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी 125 जिल्ह्याच्या विकसासाठी काम केले आहे. त्या विकासासाठी सुध्दा युएसएआयडीने पैसे दिलेले आहेत. झिरो कार्बन या योजनेसाठी रेल्वेला सुध्दा युएसएआयडीने पैसे दिले आहेत आणि या सर्व योजनांना आम्ही तयार केले असे सांगून केंद्र सरकारने, भारतीय जनता पार्टीने राजकीय पटलावर आणून त्याचा फायदा घेतला.
जॉर्ज सोरोस हा दुसरा खलनायक अमेरिकेतलाच व्यक्ती आहे. ऍलॉन मस्क हा तर आजच्या परिस्थितीत अमेरिका चालवितो असे म्हटले तरी चुक ठरणार नाही. आताच्या पंतप्रधान दौऱ्यात ऍलॉन मस्क आपली पत्नी, आपली मैत्रीण आणि दोन लेकरांना घेवून भारताच्या पंतप्रधानांसोबत आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठककीत बसला होता. यावरून भारताच्या पंतप्रधानांना आपल्या पदाची ऊर्जा काय आहे हे कळते काय हा प्रश्न उपस्थित होतो. तरीपण भारताची लोकशाही सर्वात प्रबळ आहे असे म्हणतांना थोडी लाज सुध्दा वाटत नाही. जगभरात गरजवंतांना पैसे देणाऱ्या दोन संस्था आहेत. जागतिक बॅंक आणि आयएमएस या संस्थांकडून भारताने एवढे कर्ज घेतले आहे की, त्यांनी आता लाल कंदील लावून टाकला आहे. अशा परिस्थितीत भारताची लोकशाही प्रबळ आहे म्हणे.
म्हणूनच खा.राहुल गांधी लोकसभा निवडणुकीपुर्वी म्हणाले होते की, भारताची निवडणुक अमेरिकेच्या हातात आहे. पण त्यांचे बोलणे त्यावेळी अजब वाटले आज त्यांचेच बोलणे खरे वाटत आहे. युएसएआयडीच्या निधीचा प्रभाव भारताच्या 2024 मधील निवडणुकांवर पडला असे म्हणताच येईल. विचार करा भारतीय जनता पार्टीच्या मागणी प्रमाणे 400 पार खासदार निवडूण आले असते तर मग भारताच्या लोकशाहीची काय अवस्था झाली असती. नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयटी यांचे खोटे खटले दाखल करून अनेक वर्ष तुरूंगात ठेवले. मुख्य निवडणुक आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीमधून भारताच्या सर न्यायाधीशांना वगळले. माधवी बुच आणि गौतम अडाणी यांचे संबंध दिसत असतांना त्यांची चौकशी झालीद नाही आणि चाटूकार मिडीया युएसएआयडीला खलनायक ठरवत आहे. असे करू नका मित्रांनो तुमची विश्र्वासहार्यता संपत चालली आहे. आज दर्पकारांचा जन्मदिन आहे. ज्या योजना युएसएआयडीच्या निधीवर चालल्या त्या युएसएआयडीला खलनायक बनवून तुम्हाला काय भेटणार आहे. जे काय भेटायचे होते ते सर्व भारतीय जनता पार्टीने तुम्हाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येत दिले आहे. विचार करा आपण जेवतांना एक पोळी चुकीने जास्त खाली तर ती आपल्याला त्रास देते. मग जास्तीचे पैसे करणार तरी काय ? यावर नक्कीच स्वत:ला प्रश्न विचारा आणि तुमची सद्सद् विवेक बुध्दी जे काही करायला सांगेल तेच करा.
