नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन

*संविधानाच्या प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले वाचन*

नांदेड, – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा गौरव म्हणुन शिवकालीन प्रशासनातल्या बाबीचा आढावा घेवून उपस्थित सर्व खेळाडू, विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानाचे वाचन करुन संविधानाप्रती व छ.शिवाजी महाराज यांच्याप्रती सन्मान व गौरवउल्लेख केला.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती 19 फेब्रुवारी,2025 निमीत्त “जय शिवाजी- जय भारत पदयात्रा” चे आयोजन केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

ही पदयात्रा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र, युवा भारत नांदेडच्या वतीने व जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, उपायुक्त गिरीश कदम, अजितपालसिंग संधू, क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी पांचगे, व्यंकटेश चौधरी, नेहरु युवा केंद्राच्या चंदा रावळकर यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

तसेच नांदेड जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून या पदयात्रेस प्रारंभ झाला. चिखलवाडी कॉर्नर, तहसील कार्यालय, अण्णाभाऊ साठे पुतळा, आयटीआय चौक, शिवाजीनगर आणि वजिराबाद चौक या मार्गाने ही यात्रा पार पडली. समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या पदयात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव म्हणुन घोषणा देण्यात आल्या.

जय शिवाजी जय भारत” या पदयात्रेमध्ये खेलो इंडिया टेबलटेनिस सेंटर, एन.एसी.सी. विभाग, एन.एस.एस.(राष्ट्रीय सेवा योजना), राजर्षी शाहु विद्यालय शिवाजी हायस्कुल, माणिकनगर, महिला महाविदयालय, एकनाथ अकॅडमी, आर्चरी अकॅडमी, नांदेड जिल्हा वुशू असो., विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी, महानगरपालिका व विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्व विदयार्थी, खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरीक यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत बिस्कीट व पाणीची व्यवस्था करण्यात आली होती. या रॅलीस नांदेडकरांनी भरभरुन व उत्सफुर्त प्रतिसाद दिला असे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

“जय शिवाजी जय भारत” पदयात्रा यशस्वी करणेसाठी जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, डॉ. राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, वैभव दोमकोंडवार, आकाश भोरे, ज्ञानेश्वर सोनसळे, सुशिल कुरुडे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे आदीनी यशस्वी करण्यास सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!