नांदेड(प्रतिनिधी)-रिंदाच्या भावाचा खून झाल्यानंतर त्याला मारणाऱ्याचा सुध्दा शेवट करण्यासाठी 10 फेबु्रवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात आज एटीएस शाखेने दोन जणांना न्यायालयासमक्ष हजर केल्यानंतर न्यायालयाने त्या दोघांना 5 दिवस 24 फेब्रुवारीपर्यंत पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात मुळ गोळीबार करणाऱ्या गुन्हेगाराला मदत करण्याची संख्या आता 5 झाली आहे. त्यातील चार नांदेडचे आहेत आणि एक पंजाब येथून आणला आहे. तो हल्लेखोराचा नातलग आहे.
दहा फेबु्रवारी रोजी शहिदपुरा भागात सकाळी 9 वाजेच्यासुमारास गोळीबार झाला. या गोळीबारात दुचाकीवर मागे बसलेला गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार (35) हा होता. यानेच हरविंदरसिंघ उर्फ रिंदा जो आज बब्बर खालसा या संघटनेत सहभागी झाला आहे. त्याचा भाऊ सत्येंद्रसिंघ उर्फ सत्या याचा खून केल्याप्रकरणी गुरमितसिंघ सेवादार हा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी आहे. तो पॅरोल रजेवर आला होता. त्यावेळी झालेल्या गोळीबारातील गुरमितसिंघला लागलेल्या गोळ्या त्याच्या शरिराच्या आरपार होवून रविंद्रसिंघ दयालसिंघ राठोड (30) या गाडी चालविणाऱ्या युवकाला लागल्या. उपचारादरम्यान तो मरण पावला. गुरमितसिंघ सेवादार सध्या उपचार घेत आहे. या प्रकरणी गुरमितसिंघच्या जबाबावरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमंाक 62/2025 भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 आणि 3/27 प्रमाणे दाखल झाला.
वजिराबाद पोलीसांनी सर्व प्रथम हल्लेखोराला मदत करण्याच्या आरोपातून मनप्रितसिंघ उर्फ मन्नु गुरुबक्षसिंघ ढिल्लो (31) आणि हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पील बाबुसिंघ कारपेंटर या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने 20 फेबु्रवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. दरम्यान हा गुन्हा दहशतवाद विरोधी पथकाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. पंजाबला गेलेल्या पोलीस पथकाने तेथून अर्शदिपसिंघ भजनसिंघ (28) या युवकाला पकडून आणले. त्याला न्यायालयाने काल दि.18 फेबु्रवारीपासून 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. कालच रात्री पोलीसांनी नंादेड येथील दलजितसिंघ करमसिंघ संधू (41) आणि हरजितसिंघ उर्फ राजू अमरजितसिंघ गिल (31) या दोघांना अटक केली. आज एटीएस पथकाचे पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर रेंगे, पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुट्टे, जगदीश भंडरवार, माणिक बेद्रे यांनी आपल्या सहकारी पोलीसांसह न्यायालयात हजर केले.
न्यायालयात पोलीस उपअधिक्षक रेंगे आणि सरकारी वकीलांनी असा युक्तीवाद मांडला की, या युवकांकडून एक सिम कार्ड जप्त करायचे आहे, दुचाकी जप्त करायची आहे. ज्यावर तो हल्लेखोर नांदेडमध्ये फिरला. तसेच गुन्ह्याच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. या प्रकरणात हरजितसिंघ उर्फ राजू गिलची बाजू ऍड.समिर पाटील यांनी मांडली. त्यावेळी त्यांनी पीसीआर यादीतील उद्देश या शब्दावर जोर देत उद्देश हा जप्त करण्यासारखी वस्तु नाही असा युक्तीवाद मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी संधू आणि गिलला पाच दिवस अर्थात 24 फेबु्रवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
गोळीबार प्रकरणात आज दोन जणांना पोलीस कोठडी ; अटक आरोपी झाले पाच
