आज आपल्या लाडक्या महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. महाराज एक पराक्रमी योद्धा होतेच, पण त्याचबरोबर ते अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि जाणते राजे होते. कल्याणच्या मोहिमेवर आबाजी सोनदेव यांना पाठवण्यात आले होते. कल्याणच्या सुभेदार, मुल्ला अहमद याने आपला संपूर्ण लुटलेला खजिना आपल्या मुला आणि सुनेसोबत विजापूरला पाठवला होता. शिवाजी महाराजांनी कल्याण खजिना सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतला आणि कल्याण तसेच भिवंडी काबीज केली.
या लढाईत सुभेदाराच्या सुनेलाही बंदी करण्यात आले. जेव्हा सर्व कैद्यांचा न्याय केला जात होता, तेव्हा तिच्या बाबतीतही निर्णय घेण्यासाठी तिला महाराजांच्या समोर आणण्यात आले.
महाराज म्हणाले, “पापाचे समर्थन पापाने होत नाही. लोक रिवाजांपेक्षा माणुसकीचा धर्म महत्त्वाचा आहे. आपला ध्वज भगवा आहे, तो पवित्रतेचे प्रतीक आहे.” तिच्या सौंदर्याची वंदना करत महाराज म्हणाले, “हीच लावण्य पाहून आम्ही चकित झालो. आमच्या माॅ साहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर निपजलो असतो.” त्यांनी आपल्या माॅ साहेबांची आठवण करून देणारी ही प्रतिक्रिया दिली.
“आमच्या माॅ साहेबांप्रमाणे तिला सन्मानाने पाठवण्यात येईल. ज्या इतमामाने आमच्या माॅ साहेबांना रवानगी देतो, तसाच आदर आणि सन्मानाने ह्या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवायला हवं.”
सुभेदाराची सुनेच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.असे न्यायप्रिय आणि संवेदनशील होते आपले महाराज. आपल्या हक्क आणि स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांनी निष्पापांवर कधीही अन्याय होऊ दिला नाही. *आपल्याला सर्वांनी या गोष्टीवर विचार करण्याची आवश्यकता आहे.*
मधुकर जोशी यांची एक कविता आठवते:
शिवरायाच्या दरबारी त्या,
युवती मोहक ती
सुभेदाराची सून लाडकी
भयकंपित होती
शब्द ऐकता चकित झाली
हरिणीसम ती रती
‘अशीच आमुची आई असती
सुंदर रूपवती
आम्हीही सुंदर झालो असतो,’
वदले छत्रपती.
_कल्याणी खंडेलवाल.