रिपब्लिकन सेनेच्या महानगर शहराध्यक्षपदी राहुल चिखलीकर यांची निवड

नांदेड –  आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते राहुल चिखलीकर यांच्या सामाजिक, संघटनात्मक कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा सचिव माधव जमदाडे आणि रिपब्लिकन सेनेचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी राहुल चिखलीकर यांची नांदेड महानगर शहराध्यक्षपदी निवड झाल्याचे राहुल चिखलीकर यांना पत्र दिले.

शहरातील शासकीय विश्रामगृह येथे रविवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता नांदेड महानगर शहराध्यक्ष पदाच्या निवडीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा सचिव माधव जमदाडे आणि रिपब्लिकन सेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी एकमताने आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते राहुल चिखलीकर यांची रिपब्लिकन सेनेच्या नांदेड महानगर शहराध्यक्षपदी निवड करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मधुकर झगडे, प्रतीक मोरे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अंकूश सावते आदींची उपस्थिती होती. राहुल चिखलीकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे  मित्र मंडळीकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हा मेळावा लवकरच – प्रा.राजू सोनसळे

आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने फुले, शाहू, आंबेडकरी पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन सेना या पक्षांमध्ये प्रवेश करणार आहेत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये शहरातील शंकरराव चव्हाण सभागृह येथे जिल्हा मेळावा आयोजित करण्यात येवून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नांदेड महापालिका तसेच नगरपालीकांमध्ये मोठ्या रिपब्लिकन सेनेचे प्रतिनिधी पाठवले जाणार असल्याचे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!