नांदेड(प्रतिनिधी)-बाथरुमच्या पाण्यावरून झालेल्या भांडणानंतर काही जणांनी एका घरात हत्यारांसह प्रवेश करून धुडगुस घातला आणि त्या घरातील एका व्यक्तीच्या खिशातील 15 हजार 650 रुपये बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार मौजे करंजी ता.हिमायतनगर येथे घडला आहे.
शेख जहीर शेख जलील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 फेबु्रवारी रोजी दुपारी 12 वाजता मौजे करंजी ता.हिमायतनगर येथे त्यांच्या घरात रामेश्र्वर नारायण गाडेकर, ज्ञानेश्र्वर नारायण गाडेकर, नारायण अर्जुन गाडेकर, लक्ष्मीबाई नारायण गाडेकर, सरस्वी नारायण गाडेकर आणि नयना ज्ञानेश्र्वर गाडेकर असे सहा जण घुसले. या दोन कुटूंबामध्ये अगोदरपासून बाथरुमच्या पाण्यावरून भांडणे होत होती. घरात घुसले तेंव्हा त्यांच्या हातात कुऱ्हाड व चाकू असे हत्यार होते. त्यांनी शेख जलील यांच्या खिशातील 15 हजार 650 रुपये बळजबरीने चोरून नेले आहेत. हिमायतनगर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 38/2025 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
मौजे करंजी ता.हिमायतनगर येथे दरोडा
