नांदेड(प्रतिनिधी)-19 फेबु्रवारी रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनी विविध कार्यक्रम राबविण्यासंदर्भाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सर्वसामान्य विभागाचे अव्वर सचिव सचिन कावळे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रसारीत करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार दरवर्षी 19 फेबु्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. त्या संदर्भाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे, स्मारके, रंगरंगोटीत करावी. तेथे साफसफाई करून सुशोभिकरण करून ते झाल्याची खातरजमा संबंधीत विभाग प्रमुखांनी करून घ्यावी. सामान्य प्रशासन विभागाच्या 1 फेबु्रवारी 2023 रोजी महाराष्ट्राच्या राज्य गिताची घोषणा करण्यात आली. ते राज्यगित अनुपालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करतांना महाराष्ट्र राज्याच्या गिताचे गायन व्हावे. सर्वसंबंधीत वरिष्ठ अधिकारी व संबंधीत कार्यालय प्रमुख यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे आणि त्यानंतर छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावे. उपक्रम यशस्वी पार पाडावयाचे असल्याने त्यांचे योग्य व काळजीपुर्वक नियोजन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधीत यंत्रणांनी 19 फेबु्रवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन व अंमलबजावणी करावे असे या परिपत्रकात नमुद आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव काटेकोर नियोजन करून पार पाडा
