भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेल्यावर एका संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अमेरिका जगाचा बाजारावर अधिराज्य गाजवणार असे सांगितले. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांना नैतिकतेचे धडे शिकवले. पण अमेरिकन राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या अमेरिकेच्या कर नितीप्रमाणे भारताला दरवर्षी 3 लाख कोटी रुपयांचा टोटा होणार हे सुनिश्चित झाले आहे. म्हणूनच ट्रम्प म्हटले होते, मोदी इज कमिंग अर्थात मी मोदीला बोलविले नाही. तसेच सुरक्षा व्यवयातील एफ-13 ही विमाने भारत खरेदी करणार आहे की, नाही हे माहित नाही. पण डोनॉल्ड ट्रम्पने भारताला मी हे विक्री करणार आहे जाहीर करून टाकले. दोन दिवसांपुर्वीच वास्तव न्युज लाईव्हने या संदर्भाने प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार नरेंद्र मोदी अमेरिकेत निकामी झालेली 3 लाख कोटीची विमाने खरेदी करणार अशा संदर्भाचे वृत्त प्रकाशीत केले होते. हे वृत्त ट्रम्पच्या जाहीर केलेल्या वक्तव्याप्रमाणे सत्य ठरले आहे.
भारताचे पंतप्रधान अमेरिकेत गेले आणि तेथे झालेल्या ट्रम्पसोबतच्या बैठकीनंतर दोन्ही देश प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात अमेरिकन पत्रकाराने नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला की, भारतातील गौतम अदानी याने अमेरिकेत केलेल्या आर्थिक भ्रष्टाचारासाठी आपण अमेरिकेच्या राष्ट्र अध्यक्षांकडे कार्यवाहीची मागणी केली आहे काय? यावर हिंदीमध्ये उत्तर देतांना नरेंद्र मोदी यांनी अशा खाजगी प्रकरणांसाठी दोन देशांचे प्रमुख भेटत नसतात आणि त्यावर बोलत नसतात. असे सांगितले. यासोबत भारत हा वसुधैव कुटूंबकम या तत्वावर चालतो असे सांगितले. आमची संस्कृती तिच आहे. आम्ही विश्र्वाला आमचा परिवार समजतो असे नैतिकतेचे धड्डे दिले. सोबत प्रत्येक भारतीयाला मी माझ्या मानतो असे सांगत नैतिकतेच्या परिसिमा गाठल्या. नरेंद्र मोदींच्या या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांनी वावडी उठवली. त्यांनी सोशल मिडीयावर प्रसिध्द केलेल्या शब्दांप्रमाणे मोदी अदानीबद्दल काहीच बोलले नाहीत. भारतात प्रश्न विचारला तर ते उत्तर देत नाहीत. विदेशात विचारला तर खाजगी बाब सांगतात. म्हणजेच अमेरिकेत अदानीने केलेल्या चुकीच्या व्यवहारावर परदा टाकला. जेंव्हा मित्राचा खिसा भरायचा असतो. तेंव्हा मोदीसाठी ते राष्ट्रनिर्माण असते आणि भ्रष्टाचार आणि देशाच्या संपत्तीला लुटणे याला मोदी खाजगी व्यवहार म्हणतात. ही भारताच्या पंतप्रधानांची सत्यता आहे.
अंतरराष्ट्रीय स्तरावर अदानीची घटना खाजगी प्रकरणात बदलता येते हे मोदींनी दाखवून दिले. अमेरिकेच्या वॉशिंगटन डीसीमध्ये झालेल्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी हे दाखवून दिले की, मला अमेरिकेत उत्पादन होणारे सामान जगाच्या बाजारात आणायचे आहे. तसेच अमेरिकेत जगातून येणारे साहित्य यावर जास्तीत जास्त कर लावून नफा कमवायचा आहे. व्यवसायात मी कोणतीच संधी करणार नाही याचा प्रभाव व्यपाराच्या माध्यमातून जगावर पडणार आहे. भारताला डोनॉल्ड ट्रम्पच्या या निर्णयामुळे 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. एवढाच फायदा अमेरिकेला होणार आहे. ब्रिक्स देशांना सुध्दा अमेरिकेने तंबी दिली आहे की, आमच्या डॉलरसोबत गेम केला तर मी सर्वांचा गेम करून टाकेल. म्हणजे अमेरिकेच्या मुद्रेला कोणी धक्का लावू नये असा त्याचा अर्थ आहे असे असेल तर मोदी यांनी अमेरिका दौरा करून काय मिळवले असा प्रश्न आम्ही उपस्थित केला तर आम्हाला देशद्रोही ठरविले जाईल. पण आम्हाला देशद्रोही ठरवतांना त्यासाठी पुरावे द्यावे लागतात. हे आरोप करणाऱ्यांना सुध्दा माहित असेलच त्यामुळे आम्हाला जास्त चिंता नाही.
भारत आणि अमेरिका यांच्या संबंधात एक नवीन आलेख या निमित्ताने तयार होणार आहे. त्यामध्ये अभ्यासपुर्ण विवेचन करायचे असेल तर सन 2019 मध्ये अमेरिकेत जाऊन आपकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यावर्षी भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये 90 बिलियन डॉलरचा व्यवहार झाला होता. त्यात भारताचा व्यवहार 17.5 बिलियनने जास्त होता. हा व्यवहार पुढे दरवर्षी वाढत गेला. ज्यात 2020-21 मध्ये 22.7 बिलियन, सन 2021-22 मध्ये 32.9 बिलियन , सन 2022-23 मध्ये 27.7 बिलियन, सन 2023-24 मध्ये 33.3 बिलियन आणि यंदाच्या सन 2024-24 मध्ये 40 बिलियन असेल असा अंदाज आहे. पण आता या सर्वांवर पाणी फिरले आहे. अमेरिकेत झालेल्या चर्चेनंतर अमेरिकन राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी असे जाहीर केले की, कच्चे तेल आणि गॅस, सैन्याचे हार्डवेअर आणि एफ-35 हे विमान भारत खरेदी करणार आहे. डोनॉल्ड ट्रम्पच्या या जाहीरीकरणाला भारताने तात्वीक स्तरावर दुजोरा दिलेला नाही. यापुर्वी भारत रशियाकडून 30 टक्के डिस्काऊंटवर कच्चे तेल खरेदी करत होता. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 60 हजार कोटींचा नफा झाला आहे. पण आता हे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे आमची अर्थव्यवस्था त्रासात येणार आहे. अमेरिका, चिन, रशिया यांच्याविरुध्द बोलणार नाही. अशा परिस्थितीत आम्ही ही राजकीय प्रक्रिया कशी साध्य करणार हा प्रश्न भयंकर आहे.
यावेळी अमेरिकन पत्रकारांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेला प्रश्न महत्वपुर्ण आहे त्यात पत्रकारांचा प्रश्न असा आहे की, रशिया आणि युक्रेन युध्दात भारत कोठे उभा आहे. यावर मोदी म्हणाले की, आम्ही तटस्थ राहण्याचा अर्थ आम्ही आमचे फायदे पाहतो. पण आम्ही शांतीप्रिय देश आहो. शांतीची अपेक्षा आम्हाला रशिया आणि युक्रेन कडून आहे. आम्ही कधीच युध्दाच्या पक्षात नव्हतो. याला थोडे मागे जावून पाहिले तर मागे अमेरिकन राष्ट्र अध्यक्ष जोबोयडन असतांना ते युध्दाच्या पक्षात होते. आजच्या परिस्थितीत ट्रम्प असे सांगतात की युध्दात किती पैसा नष्ट करणार. ट्रम्प रशियाला विचारतात तुम्ही 400 बिलियन डॉलर खर्च केले. चिनला विचारतात तुम्ही 500 बिलीयन डॉलर खर्च केले. अमेरिकेने स्वत: या युध्दा 700 बिलियन डॉलर खर्च केले. म्हणून पैशांची बरबादी करू नका असा ट्रम्पचा विचार आहे. पण भारताला सैन्य सामान विकण्यामध्ये ट्रम्पला भारताकडून अपेक्षा आहे.
अमेरिकन राष्ट्र अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी पारस्पारीक शुल्क लागणारच याचा अर्थ जेवढा कर त्यांच्याकडून आयात केलेल्या वस्तुवर इतर देश लावतात. तेवढाच शुल्क अमेरिका आपल्या डॉलरच्या रुपात त्या देशांवर लावणार त्यामुळेच भारताच्या अर्थसंकल्पात अमेरिकेच्या अनेक साहित्यांवर कर कमी करण्यात आले आहेत. त्याबद्दल ट्रम्प सांगतात आपण अनेक चुकीच्या वस्तु कमी केल्या आहेत. अमेरिका सांगत आमचे सहकारी सुध्दा आम्हाला शत्रुपेक्षा वाईट आहेत. अमेरिकेचे हे शब्द ब्रिक्स देशांसाठी आहे. त्यामध्ये भारत सुध्दा आहे. ब्रिक्स देशांना अमेरिकेने आवाहन दिले आहे की, माझ्या डॉलरला धक्का लावू नका या शब्दांमुळे आता अमेरिकेकडून जास्त खरेदी करावी लागेल तर भारताच्या मेक इन इंडियाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. भारतात काही लोकांच्या हक्कात असलेली संपत्ती आता अमेरिकेच्या आवाहनानंतर उघड पडली आहे. यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: अमेरिका दौरा आयोजित करून काय मिळवले हे आम्ही लिहिण्यापेक्षा वाचकांनी स्वस्त ठरवावे.
नरेंद्र मोदींच्या अमेरिकन दौऱ्यानंतर भारताला दरवर्षी 3 लाख कोटी रुपयांचा तोटा होणार हे ठरले
