नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात अवैध वाळू चोरीच्या 23 टिपर व ट्रकवर कार्यवाही करून 3 कोटी 15 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कार्यवाही केली आहे.
दि.11 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मौजे गंजगाव येथील खाजगी रेती घाटावर पोलीस निरिक्षक संजय शिंदे, पोलीस उपनिरिक्षक दिलीप मुंडे, पोलीस अंमलदार मारोती मुद्देमवार, आनंदा शिंदे, बाबाराव बंडगर, शेख अनवर, अशोक भंडरवार, माधव जळकोटे, गजानन अनमोलवार, व्यंकट धोंगडे, वच्चेवार आदींनी तेथे गेलेल्या तपासणीत मांजरा नदीच्या पात्रातून अवैध पध्दतीने वाळू उपसा करणारे अनेक जण होते. त्यात पोलीसांनी 23 टिप्पर व ट्रक रेतीसह आणि 2 पोकलेन असा 3 कोटी 15 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गणेश रामराव हिवराळे, जाकेर खान मिर्झा खान सोबत सर्व ट्रक आणि टिपरचे चालक आणि मालक, दोन पोकलेनचे चालक आणि मालक यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 39/2025 दाखल केला आहे. पोलीसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळूवर केलेली ही बऱ्याच दिवसानंतर कार्यवाही आहे.
गंजगाव रेती घाटावर कार्यवाही; 3 कोटी 15 लाखांचा ऐवज जप्त

Video Player
00:00
00:00