महाराष्ट्रात लवकरच मोठी राजकीय घडामोड होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतून परत आल्याबरोबर एकनाथ शिंदे आपली शिवसेना भारतीय जनता पार्टीत विलीन करतील आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. देवेंद्र फडणवीसांचा पंतप्रधान शर्यतीतील पत्ता कट करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे हे दोघे मिळून हा डाव खेळणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला पाठींबा देईल काय? याचा विचार केला तर तो नकारात्मक दिसतो. कारण आरएसएस पहिल्यापासूनच 2029 मध्ये पंतप्रधान शर्यतीत देवेंद्र फडणवीस असावे यासाठी प्रयत्नशिल आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये आपला पक्ष विलीन करून काय मिळणार एकनाथ शिंदे यांना याचा विचार केला तर एकनाथ शिंदे सुध्दा मुरब्बी राजकारणी आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आपला पक्ष विलिन केला तर केंद्रामध्ये भाजपची संख्या 240 वरुन 247 होईल आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाऐवजी मुख्यमंत्री पद मिळेल. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावून घेतले जाईल आणि शिवराजसिंह चव्हाण यांच्यासारखे मंत्री पद दिले जाईल. शिवराजसिंह चव्हाण लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास 10 लाख मताधिक्यांनी निवडुण आलेले उमेदवार आहेत. का करावे एकनाथ शिंदे यांनी असे. याच्यावर विचार केला तर एकनाथ शिंदे यांना माहित आहे की, भारतीय जनता पार्टी ज्या-ज्या पक्षांना हाताशी धरुन राज्य करण्याच्या खेळी चालवते. त्या सर्व पक्षांना भारतीय जनता पार्टीने समाप्त केले आहे. असाच प्रकार भाजपने मुळ शिवसेनेसोबत केला. कारण त्यांना दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाकडे हिंदुत्व हा मुद्या असावा असे वाटत नाही. विशेष करून राज्यस्तरावरील राजकीय पक्षांना समाप्त करण्याचा भाजप अजेंडा आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांना वाटत असेल की, माझी गरज संपल्यावर माझा सुध्दा असाच हाल होईल आणि म्हणून अत्यंत वाईट परिस्थितीत आपले राजकारण संपविण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीला आवडेल त्या पध्दतीची खेळी करून आपले राजकीय भविष्य सुरक्षीत ठेवावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून आजच्या परिस्थितीत देशात तीन लोकांनाकडे पाहिले जाते. त्यात प्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, द्वितीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तृतीय क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण आरएसएसने या अगोदरच पुढे 2029 मध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवून ती निवडणुक लढवायची आहे. ही बाब अमित शाह यांना खपणारी नाही आणि अशा परिस्थितीत अमित शाहाच्या क्रमांकाला धक्का लागेल. या परिस्थितीत आरएसएस अमित शाहच्या क्रमांकाला सुध्दा हिरवा कंदील दाखवणार नाही आणि त्यांनी जर हिरवा कंदील दाखवला नाही तर अमित शाह पंतप्रधानच्या शर्यतीतून बाहेर येतील म्हणून त्यांनाही आवश्यक आहे की, मी एकटाच रेसमध्ये आहे हे दाखवता आले पाहिजे आणि म्हणून ते देवेंद्र फडणवीसांचा क्रमांक कापु इच्छितात. आरएसएसने नरेंद्र नंतर देवेंद्र हे ठरवलेेलेच आहे. म्हणून आपल्याला त्रास दायक ठरणारी नावे शर्यतीतून कमी करणे अमित शाह यांना आवश्यक आहे. पण आरएसएसच्या अजिंड्या प्रमाणे तो अमित शाहच्या स्वप्नांना धक्का आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या शर्यतीतील एक-एकाचे नाव कापणे सुरू केले आहे. यश कोणाला येईल हे आज नाही सांगता येणार पण असा राजकीय भुकंप आलाच तर आरएसएसमध्ये सुध्दा मोठे हादरे बसतील. कारण तेथे सुध्दा एक गट अमित शाहचा आहे आणि एक गट नरेंद्र मोदी यांचा आहे. त्यात सरसंघ चालक मोहन भागवत हे मात्र 100 टक्के देवेंद्र फडणवीसच्या हक्कात आहेत. पाहुया येणाऱ्या काळात महाराष्ट्राला काय चित्र पाहायला मिळेल.
सोर्स: दिपक शर्मा, विवेक देशपांडे, प्रकाश पोहरे.
अमेरिकेतून मोदी परत आल्याबरोबर महाराष्ट्रात होणार मोठा राजकीय भुकंप
