नांदेड (प्रतिनिधी)-ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा.रं.बोराडे यांचे आज मंगळवारी निधन झाले. त्यांचे वय ८५ वर्ष होते. त्यांच्यावर दुपारी छत्रपती संभाजीनगर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथील विनायक पाटील महाविद्यालय येथे प्राचार्य असलेले रा.रं.बोराडे हे मागील काही दिवसापासून आजारी होते. त्यांनी आज जगाला निरोप दिला. मागील आठवड्यात राज्य शासनाचा विं.दा.करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी ५५ वर्षापूर्वी प्रसिध्द केलेली कादंबरी पाचोळा हि प्रचंड गाजली होती. त्यांनी आमदार सौभाग्यवती हि पण कादंबरी लिहिली होती. त्यावर पुढे नाटक तयार झाले. च्ाारापाणी या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषदेचा वैâ.नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला होता. कणस आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा आदी कथा संग्रहासह रा.रं.बोराडे यांनी शिका तुम्ही हो शिका हि बाल कादंबरी पण लिहिली. रटाळ पाळणा हे आदी साहित्य बोराडे यांच्या लेखणीतून उतरलेले आहेत. १९८९ साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले.
लातूर जिल्ह्यातील काटगाव येथे २५ डिसेंबर १९४० रोजी त्यांचा जन्म झाला होता. परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक होते. वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात १९९१ पर्यंत प्राचार्य होते. आणि त्याच वर्षात त्यांनी देवगिरी महाविद्यालयातून सेवानिवृत्ती पत्कारली होती. वास्तव न्युज लाईव्ह परिवार बोराडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
प्रसिध्द साहित्यिक, ग्रामीण कथाकार, शिक्षक रा.रं.बोराडे यांचे निधन
