नांदेड(प्रतिनिधी)-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सत्कार करण्यासाठी थांबलेल्या गर्दीतून एका डॉक्टरच्या खिशातील पैसे चोरणाऱ्या दोघांना पकडण्यात आले आहे.
डॉक्टर दिपक काशीनाथ नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 फेबु्रवारी रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास वर्कशॉप कॉर्नर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी ते आणि त्यांचे मित्र थांबले असतांना गर्दीचा फायदा घेवून पंकज गोविंदराव खाडे (23) आणि राजू आनंद खंडागळे (25) या दोघांनी त्यांच्या आणि त्यांच्या मित्रांच्या खिशातील 41 हजार 600 रुपये रोख रक्कमसह आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना असे साहित्य चोरले. लोकांनी आणि पोलीसांनी या चोरट्यांना ताबडतोब पकडले. भाग्यनगर पोलीसांनी या दोन चोरट्यांविरुध्द गुन्हा क्रमांक 87/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक वाडेवाले हे करीत आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी थांबलेल्या डॉक्टरच्या खिशातील पैसे चोरले ; दोन चोरटे अटक
